Tribal Politics : आदिवासींच्या वन दाव्यांसाठी सत्ताधारी राष्ट्रवादीने दाबले प्रशासनाचे नाक; शहर तीन तास ठप्प!

Jalgaon Tribal Protest : जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासींनी सरकारविरोधात एल्गार पुकारला असून गेल्या चार दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.
Jalgaon Tribal Protest; NCP Pratibha Shinde
Jalgaon Tribal Protest; NCP Pratibha Shindesarkarnama
Published on: 
Updated on: 

Pratibha Shinde News : आदिवासींचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रतिभा शिंदे या सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात सहभागी झाल्या होत्या. मात्र, सरकारच्या उदासीनतेमुळे हे आदिवासी आता रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली.

गेल्या चार दिवसांपासून आदिवासींच्या वनदाव्यांसह अन्य प्रश्नांसाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.

आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाने स्थानिक स्तरावरील मागण्यांबाबत आश्वासन देऊन कार्यवाही सुरू केली. ज्या आदिवासींची शिधापत्रिकेत नावे नाहीत, तसेच ज्यांचे वनदावे मंजूर झालेले नाहीत, अशा आदिवासींची यादी तयार करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

Jalgaon Tribal Protest; NCP Pratibha Shinde
Jalgaon Unique Protest : रस्त्यावरील खड्ड्यांना हळद-कुंकू वाहिले, 'आरतीही' उतरवली; जळगावकरांचे अनोखे आंदोलन!

राज्य शासनाने 25 जानेवारी 2019 रोजी काढलेला जीआर, तसेच 11 ऑक्टोबर 2016 रोजी काढलेल्या वनहक्क दाव्यांबाबतच्या तरतुदींची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी आंदोलकांची मागणी आहे. याबाबत पालकमंत्री आणि महसूलमंत्र्यांनी स्वतः चर्चेसाठी यावे, या अटीवर आंदोलक ठाम आहेत.

चार दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या या आदिवासींनी बुधवारी अचानक जळगाव शहरातील स्वातंत्र्य चौक आणि आकाशवाणी चौफुली येथे रास्ता रोको केला. हा रास्ता रोको तीन तास सुरू होता. आंदोलकांची संख्या मोठी असल्याने पोलीसही हतबल झाले होते.

या आंदोलनामुळे शहरातील वाहतूक ठप्प झाली. पाचोरा, भुसावळ आणि धुळे शहरांकडे जाणारी वाहतूक या चौकातून जाते. आंदोलकांनी रस्ते अडवून धरल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. तीन तास हे आंदोलन सुरू होते. पोलिसांच्या विनंतीनंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला.

Jalgaon Tribal Protest; NCP Pratibha Shinde
NCP MLA Death Threat : विरोध केल्यास ‘खलास करू’, राष्ट्रवादीच्या आमदाराला जीवे मारण्याची धमकी; एका पत्राने राजकीय वर्तुळात खळबळ

प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात ताराचंद बारेला, जेमा बारेला, भरत बारेला, अजय पावरा, इरफान तडवी आणि कैलास मोरे या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने पालकमंत्री आणि महसूलमंत्र्यांनीच चर्चेसाठी यावे, असा त्यांचा आग्रह आहे. आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याने जळगाव शहरातील व्यवस्थापनावरही ताण येऊ लागला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com