

Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज प्रक्रियेवरून नवा वाद निर्माण झाला आहे. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या एका जाहीर वक्तव्यामुळे विरोधकांकडून निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर आणि देखरेखीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणात आता सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनीही उडी घेतली आहे.
शिवसेना आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद करा म्हणून मीच अधिकाऱ्यांना फोन करुन सांगितलं होतं. त्यानंतर ज्यावेळी फॉर्म वैध करायचा होता तेव्हाही मीच सांगितले, फॉर्म वैध करा अशी जाहीर कुबली आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली. त्यावरुन आता आमदार किशोर पाटील यांनी चव्हाण यांच्याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे. या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीने भाजपला लक्ष्य केलं आहे.
जळगाव जिल्हा बॅंकेतील या वादाला आता व्यापक स्वरुप आलं आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आमदार चव्हाण यांच्या विधानाचा दाखला देत आता भाजप सरकार आणि निवडणूक प्रक्रियेवर जोरदार टीका केली आहे. नागपुरमध्ये गुरुवारी अभिजीत दिपके यांनी पत्रकार परिषदत घेतली. या पत्रकारपरिषदेत त्यांनी जळगावच्या निवडणुकीचा उल्लेख केला.
भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत दिपके यांनी भाजप सर्वच निवडणुका दबावतंत्र वापरून लढवत आहे. कोणत्या पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज वैध ठरवायचा, कोणाचा अर्ज अवैध करायचा, कोण मतदार असतील आणि कोण नसतील, हे भाजपच ठरवत असून निवडणुकांना केवळ औपचारिकतेचे स्वरूप दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
निवडणूक आयोगाच्या कार्यपद्दतीवर दिपकेंनी बोट ठेवलं. भाजपच्या मुख्यालयातूनच प्रेस नोट जारी करून निवडणुकांचे निकाल घोषित केले जातात आणि निवडणूक आयोगाचे ज्ञानेश कुमार त्या निकालपत्राचे वाहुल्याप्रमाणे वाचन करतात, अशी टीका दिपके यांनी केली. देशात निवडणुकांची गरजच उरलेली नाही, असे वातावरण भाजपने निर्माण केल्याचा आरोपही त्यांनी केला. हा देश भाजप किंवा पीएम मोदींच्या मनमानीने चालणार नाही. तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानेच चालेल असं दिपके यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, जळगाव जिल्हा बॅंकेच्या अर्ज बाद प्रकरणाचा संदर्भ नागपूर येथील पत्रकारपरिषदेत दिला गेल्याने या वादाची व्याप्ती वाढली आहे. या प्रकरणाची चर्चा आता केवळ जळगाव जिल्ह्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. त्यामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून या प्रकरणाची दखल घेतली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.