Lok Sabha Election 2024 : 'हम भी है रेस में; मनसेनं प्रस्थापितांना ललकारलं !

Nashik MNS Preparing Election : पक्षाकडे उमेदवार नसल्याची चर्चा निरर्थक आहे. आजमितीस आमच्याकडे इच्छुकांची लाइन लागली आहे.
MNS, Raj Thackeray
MNS, Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nashik Political News : कोणत्या पक्षाची काय तयारी सुरू आहे, याकडे आमचे लक्ष नाही. मात्र, मनसेकडेसुद्धा इच्छुकांची मोठी गर्दी असून, लोकसभा निवडणुकीत मनसे प्रस्थापितांना दणका दिल्याशिवाय राहणार नाही. सत्ताधाऱ्यांकडे मते मागण्यासाठी मुद्दाच नसल्याने मनसे हाच पर्याय मतदारांना उपलब्ध असल्याचे मनसेचे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी सांगत ‘हम भी है रेस में’, असा इशारा सत्ताधाऱ्यांना दिला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापनदिन नाशिकमध्ये साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी राज ठाकरे (Raj Thackeray) हजर राहणार असून, या वेळी ते लोकसभेचे रणशिंग फुंकतील. दादासाहेब गायकवाड सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमाची मनसैनिकांकडून तयारी सुरू आहे. नुकतेच मनसे नाशिक लोकसभा संघटक प्रदेश सरचिटणीस गणेश सातपुते, प्रदेश उपाध्यक्ष पराग शिंत्रे, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे आदींनी सभागृहाची पाहणीसुद्धा केली. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वाचा असल्याने यात काही कमतरता राहणार नाही, याची काळजी मनसैनिकांकडून घेण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MNS, Raj Thackeray
Manoj Jarange News : मनोज जरांगे यांचा मोठा इशारा; म्हणाले, 'हे सरकार 12-13 दिवसांचेच, नंतर...'

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) रणधुमाळीत दोन महिन्यांपूर्वी मनसेचे अस्तित्व काय, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. स्थानिक पातळीवर मनसैनिक निवडणुकीसाठी इच्छुक होते. मात्र, राज ठाकरे यांनी हिरवा कंदील दर्शवलाच नव्हता. गत महिन्यात राज ठाकरे यांनी नाशिक दौरा केला. या वेळी त्यांनी पदाधिकाऱ्याची कानउघाडणी करीत निवडणुका लढवयाच्या असतील तर मतभेद टाळा, असा सल्लाही दिला. यानंतर पक्षीय पातळीवर घडामोडींनी जोर पकडला.

MNS, Raj Thackeray
Nafe Singh Rathi Murder : INLD प्रदेशाध्यक्षांच्या हत्येत भाजप नेत्याचा हात; माजी मंत्र्यांचा मुलगा, नातूही आरोपी

नाशिक (Nashik) लोकसभा लढवण्यासाठी राज ठाकरे दोन पावले पुढे आले. त्याचमुळे पक्षाचा 18 वा वर्धापनदिन नाशिकमध्ये साजरा करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. शक्यतो मनसेचा वर्धापनदिन मुंबईतच साजरा होतो. या वेळी प्रथमच राज ठाकरे वर्धापनदिनासाठी नाशिकला हजर राहणार आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून सुरू असलेल्या तयारीबाबत शहराध्यक्ष सुदाम कोंबडेंनी माहिती दिली. ते म्हणाले, ‘पक्षाची तयारी मनसेच्या (MNS) वर्धापनदिनावेळी सर्वांच्यासमोर येईल. पक्षाकडे उमेदवार नसल्याची चर्चा निरर्थक आहे. आजमितीस आमच्याकडे इच्छुकांची लाइन लागली आहे. काहींनी थेट पक्षप्रमुखांशी भेट घेतली. उमेदवार कोण ही चर्चा आज महत्त्वाची नाही. याबाबतचा निर्णय पक्षप्रमुख घेतील. वर्धापनदिनावेळी अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते पक्षात प्रवेश करतील. हा वर्धापनदिन नाशिकच्या राजकारणाची दिशा बदलून टाकेल,’ असा विश्वासही कोंबडेंनी व्यक्त केला.

(Edited by Sunil Dhumal)

R

MNS, Raj Thackeray
Devendra Fadnavis : जरांगेंच्या गंभीर आरोपांनंतर फडणवीसांचं मोठं पाऊल; भाजप आमदारांना दिल्या 'या' महत्त्वाच्या सूचना

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com