Loksabha Election 2024 : अनिल पाटलांनी केले मुंडेंचे समर्थन; म्हणाले, त्या ५३ मधला मीही एक आमदार...

Anil Patil राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व मदत आणि पूनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी जळगावमध्ये बोलताना धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Sharad Pawar, Dhananjay Munde, Anil Patil
Sharad Pawar, Dhananjay Munde, Anil Patilsarkarnama

Jalgaon Loksabha News : धनंजय मुंडे यांनी 53 आमदारांच्या सह्या असलेलं पत्र आजही शरद पवार साहेबांच्या कपाटात असेल, असे वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याला समर्थन देत मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी म्हटले की, त्या 53 आमदारामधला मीही एक आमदार आहे. 2019 मध्ये भाजपला पाठिंबा द्यायचा आणि सत्तेत बसायचं, अशा सूचना आम्हा आमदारांना देण्यात आलेल्या होत्या, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी अजित पवार गटचे नेते व मदत आणि पूनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी जळगावमध्ये बोलताना धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, धनंजय मुंडे यांचे वक्तव्य खरं आहे. 53 आमदार यांच्यामधला मी सुद्धा एक आमदार आहे. 2019 मध्ये भाजपला पाठिंबा द्यायचा आणि सत्तेत बसायचं अशा आम्हा आमदारांना सूचना देण्यात आलेल्या होत्या. ते सह्या असलेलं पात्र आहे. एक दिवस नक्की सर्वांना बघायला मिळेल, असं ही त्यांनी म्हटलं आहे.

आमदारांच्या फाईल्स या मोदींच्या कपाटात आहेत, असं वक्तव्य शरद पवार यांनी केल होतं. शरद पवार साहेबांना महाराष्ट्राच्या वतीने विनंती असणार आहे. जर त्या चाव्या तुमच्याकडे असतील तर लवकरात लवकर ते कपाट उघडायला लावा. आमदारांच्या फायदा होण्याइतपत एकही दुष्कृत्य एकही आमदारांकडून तसेच मंत्र्यांच्या माध्यमातून झालेलं नाही.

Sharad Pawar, Dhananjay Munde, Anil Patil
Jalgaon constituency 2024 : मतदारांच्या 'त्या' प्रश्नाने भाजप नेते का होतात निरुत्तर!

त्यामुळे जर का ते कपाट तुम्हाला माहिती असेल. तर ते कपाट लवकरात लवकर उघडायला सांगावं, चाव्या तरी द्या, असा टोला अनिल पाटील यांनी शरद पवार यांना लगावला आहे. निधीच्या बाबतीत अजितदादांनी जे वक्तव्य केलं. ती वस्तुस्थिती आहे. काम करणारा व्यक्ती हा निधी वाटण्यासाठी. मतदारांकडून केलेल्या कामाचा मोबदला म्हणून आशीर्वाद म्हणून त्या स्वरूपाची अपेक्षा करतो. निधी वाटप जो करू शकतो, तोच हे वक्तव्य करू शकतो, असे ही अनिल पाटील म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवारांना टोला...

आजपर्यंत विकासाच्या आधारावर अजितदादांनी मतं मागितली आहेत. सहानुभूतीच्या प्रयत्नातून आजपर्यंत कधीही मतं मागितली नाहीत. त्यामुळे अजितदादा जे देतात त्या आशीर्वादाच्या स्वरूपात परत सुद्धा मागतात. त्यामुळे पायाखालची वाळू घसरल्यामुळेच विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक न लढवता, केवळ खोटं बोलायचं वेगळ्या दिशेला प्रचाराचा मुद्दा न्यायचा सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करायचा. या गोष्टी आपल्याला आजच्या निवडणुकीमध्ये बघायला मिळत आहेत, असं म्हणत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर मंत्री अनिल पाटील यांनी टोला लगावला आहे.

Edited By : Umesh Bambare

Sharad Pawar, Dhananjay Munde, Anil Patil
Sharad Pawar NCP Manifesto 2024: गॅस 500 रुपयांपर्यंत करणार, शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोग; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा शपथनामा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com