Nashik News: राज्य सरकारच्या प्राथमिक शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे, आता शाळेत पहिलीपासून विद्यार्थ्यांना सैनिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी घोषणा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली आहे.
मुलामध्ये लहानपणापासून राष्ट्रभावना वाढीस लागावी, यासाठी सरकारचा प्रस्ताव आहे. पहिलीपासून विद्यार्थ्यांना सेवानिवृत्त सैनिक, स्पोर्ट टीचर, एनसीसी, स्कॉऊट गाईडचे प्राथमिक शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, माजी सैनिक कल्याण मंत्री शंभुराज देसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल,'असे भुसे म्हणाले. ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या ‘यिन’ व्यासपीठाद्वारे आयोजित ‘समर युथ समिट २०२५’ या दोन दिवसीय निवासी शिबिराच्या समारोपप्रसंगी दादा भुसे बोलत होते.
भुसे म्हणाले, "जिल्हा परिषदेच्या ४८ शिक्षकांना सिंगापूर येथे नुकतेच अभ्यास दौऱ्यासाठी पाठविले होते. तेथील शिक्षण व्यवस्थेमध्ये ‘राष्ट्र प्रथम’ ही संकल्पना असल्याचे शिक्षकांनी सांगितले. महाराष्ट्रामध्येही शालेय शिक्षणात आमूलाग्र बदल करण्यात येत आहे. शिक्षणातून देशप्रेमाची भावना निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षणात बदल दिसून येईल. यात पहिलीपासून सैनिकी शिक्षण देण्याचा मानस आहे,"
विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची जाणीव निर्माण व्हावी, ‘नेशन फर्स्ट’ हा विचार रुजविण्याच्या उद्देशाने इयत्ता पहिलीपासूनच सैनिकी शिक्षणाचे प्राथमिक स्तरावरील प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाईल, असे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.