Dada Bhuse : अभिजीत दिपकेंचा पहिलाच दणका ; शाळांची पोलखोल होताच शिक्षणमंत्री दादा भुसेंना द्यावी लागली कबुली!

Abhijit Dipke Demands Dada Bhuse’s Resignation : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसेंकडे मोर्चा वळवल्याचं दिसत आहे.
bhijit Dipke Demands Dada Bhuse’s Resignation
bhijit Dipke Demands Dada Bhuse’s ResignationSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra school conditions : नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरुन धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपकेंनी महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसेंकडे मोर्चा वळवल्याचं दिसत आहे.

महाराष्ट्रात त्यांनी शाळा सुधार आंदोलन सुरू केलंय. दिपकेंकडून राज्यातील विविध शाळांना भेटी दिल्या जात असून शाळांमधील गैरसोयी व त्रुटी निदर्शनास आणून दिल्या जात आहे. आंदोलनादरम्यान शाळेच्या दुरावस्था, शाळेतील इतर त्रुटी याबाबत शिक्षण विभागाला त्यांनी धारेवर धरलंय.

महाराष्ट्रातील शाळांची अवस्था अत्यंत दयनीय असून विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याचं दिपकेंनी म्हटलं आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातल्या उजनी येथल्या जिल्हा परिषद शाळेला भेट दिल्यानंतर तेथील अवस्था पाहून दिपकेंनी शिक्षणमंत्र्यांना सुनावलं. याची जबाबदारी नेमकी कोणाची? असा प्रश्न उपस्थित करत शिक्षण व्यवस्थेची ही अवस्था पाहता राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी अभिजीत दिपके यांनी केली.  

दरम्यान त्यावर आता स्वतः शिक्षणमंत्री दादा भुसेंनी शाळांच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण देत, त्रुटींबाबत कबुलीही दिली असून दिपकेंच्या सूचनांचे त्यांनी स्वागत केले आहे.

अभिजित दीपके यांनी सुरू केलेल्या 'शाळा सुधार' आंदोलनाच्या माध्यमातून राज्यातील शाळांची दुरवस्था आणि विविध त्रुटी शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून दिल्या जात आहेत. याबाबत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दीपके यांच्या सूचनांचे स्वागत केले असून, शाळांमधील त्रुटी दूर करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे म्हटले आहे.

bhijit Dipke Demands Dada Bhuse’s Resignation
Abhijit Dipke: ईडी, सीबीआय पाठवत असाल तर मोदींची डिग्रीही पाठवा! अभिजीत दीपकेंचे खुले आव्हान

अभिजीत दिपके शाळांना भेटी देऊन ज्या काही गैरसोई आणि त्रुटी निदर्शनास आणून देत आहेत आणि ज्या सूचना करत आहेत, त्यांचे आम्ही स्वागतच करतो. काही शाळांमध्ये त्रुटी आणि दुरवस्था असतीलच. त्या आम्ही मान्य करतो अशी कबुली शिक्षणमंत्री भुसेंनी दिली. त्याचवेळी त्रुटी सुधारण्याचा प्रयत्न देखील करत आहोत, असेही स्पष्ट केले.

bhijit Dipke Demands Dada Bhuse’s Resignation
Abhijit Dipke Education Loan : अमेरिकेतील शिक्षणासाठी पैसा कोठून आला? अभिजीत दीपकेने केला खुलासा

शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण विभाग, शिक्षक, शैक्षणिक संस्था २४ तास ३६५ दिवस मेहनत घेत आहेत. एक आदर्श विद्यार्थी घडावा, एक आदर्श राष्ट्रभक्त घडावा यासाठी शिक्षण विभाग अधिक मेहनत घेत आहे. तरी देखील दीपके किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीने शाळांमधील ज्या त्रुटी आमच्या निदर्शनास आणून दिल्या, त्यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल, त्यांच्या सूचनांचे स्वागतच आहे, असा पुनरुच्चारही भुसेंनी केला.

दीपके यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांकडे केवळ आरोप म्हणून न पाहता, शाळांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी त्याचा उपयोग केला जाईल, अशी भूमिका शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com