Abhijit Dipke Education Loan : अमेरिकेतील शिक्षणासाठी पैसा कोठून आला? अभिजीत दीपकेने केला खुलासा

Abhijit Dipke US Education : अभिजीत दीपके याने अमेरिकेतली शिक्षणावर पैसे कोठून पैसे खर्च केले, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. मोठा खुलासा केला आहे.
Abhijeet Dipke, Bhagwanrao Dipke, Anita Dipke,
Abhijeet Dipke, Bhagwanrao Dipke, Anita Dipke,Sarkarnama
Published on
Updated on

Abhijit Dipke News : काॅक्रोज जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके यांच्या आणि त्यांच्या वडिलांच्या उत्पन्नाबाबत प्रश्नचिन्हा उपस्थित करण्यात आले होते. गुजरातमधील आरटीआय कार्यकर्त्यांने अभिजीत दीपकेचे वडिल निवृत्त कर्मचारी आहेत. त्यांचे मासिक उत्पन्न 60 ते 65 हजार आहे. मग, त्यांनी मुलाच्या अमेरिकेतली शिक्षणासाठी येवढा पैसै कोठुन गोळा केला, असा प्रश्न उपस्थित केला.

अभिजीत दीपके यांनी आरटीआय कार्यकर्त्यांने प्रश्न उपस्थित करण्याआधीच साम टिव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिक्षणावरील खर्च कसा भागवाल याचे उत्तर दिले होते.

तो म्हणाला होता की, 'बोस्टन विद्यापीठातील माझ्या शिक्षणाचा मोठा खर्च मला मिळालेल्या स्कॉलरशिपमुळे भागला. उर्वरित खर्चासाठी मी बँककडून एज्युकेशन लोन घेतले होते, जे मला आता फेडायचे आहे. '

नुकत्याच एका दिलेल्या मुलाखतीमध्ये देखील अभिजिती दीपके याने आपल्या शिक्षणावर झालेल्या खर्च हा स्कॉलरशिपमुळे भागला याचा पुनर्रउच्चार केला.

त्याने राजकीय पक्ष स्थापनेबाबत थेट भाष्य केले नाही. मात्र, राजकीय दबाव गट म्हणून काॅक्रोज जनता पार्टी काम करणार असल्याचे स्पष्ट केले.

Abhijeet Dipke, Bhagwanrao Dipke, Anita Dipke,
Abhijeet Dipke : "यात म्हाताऱ्या लोकांचं काय काम?"; विद्यार्थी आंदोलनादरम्यान अभिजीत दिपके यांचं अण्णा हजारेंवर वक्तव्य चर्चेत

सीजेपीसाठी क्राऊडफंडिंग

अभिजित दीपकेंनी स्पष्ट केले की, काॅक्रोज जनता पार्टीचे काम हे क्राउडफंडिंगद्वारे चालेल. त्यामुळे लोकांकडून मिळणाऱ्या प्रत्येक पैसैचा पारदर्शक हिशोब ठेवला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोलताना ते म्हणाले की, फक्त रिल करून उपयोग नाही विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेतले पाहिजेत. विद्यार्थ्यांना धमकावले जात आहे. त्यांच्यावर कारवाई गेली पाहिजे.

Abhijeet Dipke, Bhagwanrao Dipke, Anita Dipke,
Abhijit Dipke: राजकारणामुळेच दलित चळवळ कमकुवत झाली! आंबेडकर केवळ दलितांचे नाहीत, ते संपूर्ण देशाचे'; अभिजीत दीपके यांचे स्पष्ट मत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com