

प्रमुख मागण्या
- राज्यभरातील महसूली मंडळांची पुनर्रचना करावी
- १ नोव्हेंबर २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्यावी
- मंडळाधिकारी व तलाठी कार्यालयांसाठी निधीची तरतूद करावी
- तलाठी संवर्गाची आस्थापना पूर्वीप्रमाणे उपविभागीयस्तरावर ठेवावी
Maharashtra Talathi Strike : राज्य पातळीवर प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी वारंवार पाठपुरावा करूनही केवळ आश्वासनेच मिळत असल्याने तलाठी आणि मंडळाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सुमारे १५ हजार तलाठी व मंडळाधिकारी या आंदोलनात सहभागी होणार असून, मागण्यांसंदर्भात शासनाला पत्र देण्यात आले आहे.
११ डिसेंबर ते ११ जानेवारी या कालावधीत टप्प्याटप्प्याने हे आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यांपैकी एक म्हणून १४ डिसेंबरला नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या आंदोलनाचे स्वरुप पाहाता तलाठ्यांनी सरकारला पूर्णता घेरण्याच्या तयारी केल्याचे दिसत आहे.
महाराष्ट्र राज्य तलाठी-पटवारी मंडळाधिकारी समन्वय महासंघाने शासनाला दिलेल्या पत्रातून विविध मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये तलाठी, मंडळाधिकारी व नायब तहसीलदार संवर्गातील वेतनश्रेणी दूर करताना सुधारित वेतनस्तर लागू करावा. तसेच नायब तहसीलदार पदांसाठी खात्यांतर्गत परिक्षा घेत पदोन्नती देण्यात यावी. याशिवाय कायम प्रवासभत्त्यात वाढ करावी. मंडळाधिकारी व अव्वल कारकून यांच्यातील अदलाबदलीचे धोरण कायमस्वरुपी रद्द करावे. सादिल भत्ता लेखन सामग्रीत वाढ करावी, यासोबत इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.
महासंघाने शासनाला मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी १० डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. या कालावधीत मागण्यांची तातडीने पूर्तता न झाल्यास ११ डिसेंबरपासून आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर १४ डिसेंबरला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येईल, तर ११ जानेवारीपासून सामूहिक रजा आंदोलन छेडले जाणार आहे.
आंदोलनाच्या काळात नैसर्गिक आपत्ती आणि निवडणुकीशी संबंधित कामे वगळता अन्य शासकीय कामांवर बहिष्कार घालण्यात येईल, असे महासंघाने स्पष्ट केले आहे.
आंदोलनाचे टप्पे आणि स्वरुप
११ डिसेंबर : काळ्याफिती लावून कामकाज
१४ डिसेंबर : हिवाळी अधिवेशनावर मोर्चा
२१ डिसेंबर : तालुक्याला एकदिवसीय धरणे
२८ डिसेंबर : जिल्हास्तरावर एकदिवसीय धरणे
४ जानेवारी : डीएससी टोकन जमा करणार
११ जानेवारी : सामुहिक रजा आंदोलनास प्रारंभ
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.