Malegaon Firing : गोळीबार प्रकरणाला राजकीय वळण; राष्ट्रवादीच्या नेत्याशी संबंधित एकाला अटक?

Abdul Isa Firing Case : माजी महापौर अब्दुल इसा यांच्यावरील गोळीबार प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मालेगावमधील राजकीय वातावरण तापले आहे.
Malegaon Firing
Malegaon FiringSarkarnama
Published on
Updated on

Malegaon Political News : मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी (Malegaon Firing) शहरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांकडून कसून तपास केला जात असून त्यात यशही मिळाल्याचे सांगितले जात आहे.

याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्याशी संबंधित एकाला अटक केल्याची जोरदार चर्चा आहे. अद्याप पोलिसांकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, अटकेच्या चर्चेने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

मालेगाव शहराचे माजी महापौर अब्दुल मलिक इसा (Abdul Malik Asha) यांच्यावर सोमवारी मध्यरात्री गोळीबार झाला होता. शहरात वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडली. ईसा चहा पिण्यासाठी बसले होते, यावेळी अचानक मोटार सायकलवरून आलेल्या दोघांनी इसा यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये ईसा गंभीर जखमी असून सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Malegaon Politics)

Malegaon Firing
Shinde Group Politics: खासदार हेमंत गोडसेंच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला

यासंदर्भात मंगळवारी मागील 24 तासांत झालेल्या तपासाची माहिती पोलिसांकडून (Police) दिली जाणार आहे. पोलिसांनी दोन संशयीतांना ताब्यात घेतले आहे. त्याबाबत अत्यंत गोपनीयता बाळगली जात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा याबाबत कोणतीही माहिती देण्यास नकार दिला होता. आता वेगळीच माहिती पुढे आली आहे. (Malegaon Firing Update)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गोळीबार झाला तेव्हा ईसा यांच्याकडून देखील प्रत्युत्तर दाखल गोळीबार करण्यात आला होता. त्यात हल्लेखोरांना बचाव करण्यात यश आले. या घटनेत सहा राउंड फायर करण्यात आले. त्यात गावठी कट्ट्यांचा वापर करण्यात आला. गावठी कट्टे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे आता पोलीस शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी शहराबाहेरच्या पोलीस ठाण्यात हा गुन्हा वर्ग करणार आहेत.

याबाबत विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईसा आणि शहरातील त्यांचे प्रतिस्पर्धी माजी आमदार यांच्या नातेवाईकांमध्ये जमिनीच्या व्यवहारातून वाद होता. या वादाचा परिणाम म्हणूनच सोमवारी मध्यरात्री त्यांच्यावर गोळीबार झाला. या हल्ल्याची ईसा यांना पूर्वकल्पना असावी. त्यामुळे त्यांच्याकडूनही यामध्ये हल्लेखोरांवर गोळीबार करण्यात आला.

शहरातील माजी आमदारांच्या निकटवर्तीयाला या संदर्भात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एकूण दोघेजण पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची दाट शक्यता आहे.

 शहरातील जमिनीच्या खरेदी विक्रीतून गेल्या काही दिवसांत असे वाद वाढले आहेत. राजकीय नेत्यांनी जमिनीच्या व्यवहारांमध्ये थेट तसेच अप्रत्यक्षपणे सहभाग घेतला आहे. याबाबतचा खुलासा आज सायंकाळी पोलिस पत्रकार परिषद घेऊन करणार असल्याचे समजते.

Malegaon Firing
Malegaon News : धक्कादायक! मालेगावच्या माजी महापौरांवर तीन गोळ्या झाडल्या; एक पायाला, दुसरी छातीजवळ अन्...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com