Malegaon News : महापालिकेत नमाज पठण करणं भोवलं, सात जणांवर पोलिसांची मोठी कारवाई..मालेगावात खळबळ

Malegaon Namaz Pathan FIR : मालेगाव महापालिकेच्या विद्युत विभागात लोकसंघर्ष समितीच्या कार्यकत्यांनी नमाज पठण केलं होतं. याप्रकरणी मालेगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली असून सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Malegaon Namaz Pathan FIR
Malegaon Namaz Pathan FIRSarkarnma
Published on
Updated on

Malegaon Politics : मालेगावच्या उपमहापौर शान-ए-हिंद यांनी कार्यालयात टिपू सुलतान यांचा फोटो लावल्याने मालेगाव महापालिका वादात सापडली होती. आता आणखी एका नव्या वादामुळे मालेगाव महापालिका केंद्रस्थानी आली आहे.

महापालिकेच्या विद्युत विभागात सामुदायिक नमाज पठण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आता मोठी कारवाई केली असून सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वीज प्रश्नावर अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी महापालिकेत गेलेल्या लोकसंघर्ष समितीच्या कार्यकत्यांनी सोमवारी विद्युत विभागाच्या दालनातच नमाज पठण केलं होतं. अधिकारी नव्हते, नमाजाची वेळ झाल्याने आम्ही नमाज पढल्याचे लोकसंघर्षचे अध्यक्ष लुकमान कमाल यांनी सांगितले. या नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने वाद निर्माण झाला. (Malegaon NEWS)

Malegaon Namaz Pathan FIR
Nashik Unique Wedding : अनोख्या लग्नाची गोष्ट ! दोन एकट्या जीवांसाठी अख्खं गाव एकत्र, सीईओ ओमकार पवार झाले वऱ्हाडी..

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाची दखल घेत आक्रमक भूमिका घेतली. शासकीय इमारतीमध्ये अशा प्रकारे नमाज पठण होणे हा नियम भंग असल्याचे सांगत, त्यांनी या प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. इतकेच नाही तर, ज्या विभागात हा प्रकार घडला त्या विभागातील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, असे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.

नेमकं काय घडलं?

सध्या रमजान महिना सुरु आहे. या काळात शहरात सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याची तक्रार करण्यासाठी महापालिकेत लोकसंघर्ष समितीचे पदाधिकारी गेले होते. अनेकदा यासंदर्भात निवेदने देऊनही महापालिका प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त लोकसंघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तिथे ठिय्या आंदोलन सुरु केलं. मात्र विद्युत अधिक्षक पवार हे दालनात उपस्थितीत नव्हते. ते कामानिमित्त मुख्यालयात गेले होते. लोकसंघर्ष समितीचे पदाधिकारी त्यांची वाट पाहत होते. तेवढ्यात नमाज पठणाची वेळ झाल्याने त्यांनी सगळ्यांनी तिथेच नमाज पठण केलं. याबाबतचा व्हिडीओ सोशलमीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली.

दरम्यान, महापालिकेतील विद्युत विभागातील कर्मचारी फिर्यादी महेंद्र रघुनाथ सावंत (वय ४३) हे वायरमन असून त्यांच्या फिर्यादीवरुन लुकमान, सलीम इक्का यांच्यासह त्यांच्यासह आणखी चार ते पाच साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगाव महापालिकेच्या विद्युत विभागाच्या कार्यालयात बेकायदेशीर जमाव जमवून सार्वजनिक उपद्रव केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Malegaon Namaz Pathan FIR
Jalgaon Former Mayor : नाशिकच्या कारागृहात असलेला शिवसेनेचा माजी महापौर अडचणीत, आता दुसऱ्या प्रकरणात मुंबई पोलिस घेणार ताबा

या प्रकरणात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भातीय दंड संहिता (आयपीसी)च्या कलम १३२, १८९(२), १९० आणि २९२ (सरकारी सेवकावर हल्ला, बेकायदेशीर सभा आणि संबंधित तरतुदी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ३७(१), ३७(३) चे कमल १३५ अंतर्गतही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com