Nashik Crime : नाशिक हादरलं ! सरकारी कार्यालयातच महिला अधिकाऱ्याने संपवलं जीवन ; जावयाने केला धक्कादायक दावा

Pratibha Thakare Death Malegaon News : मालेगाव शहरातून एक अत्यंत खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. सरकारी कार्यालयातच महिला अधिकाऱ्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.
Pratibha Thakare Death
Pratibha Thakare DeathSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pratibha Thakare Death Malegaon : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मालेगाव शहरातील सहकार निबंधक कार्यालयातील विशेष लेखापरीक्षक वर्ग-२ पदावर कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याने थेट कार्यालयातच गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

प्रतिभा दिलीप ठाकरे (वय ५५) असे गळफास घेतलेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव असून, या दुर्दैवी घटनेमुळे मालेगाव शहरासह नाशिक जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. कार्यालयात आलेल्या महिला शिपायाला ही घटना दिसल्यानंतर प्रकार उघडकीस आला. पोलिसांकडून मृत्यूमागील कारणांचा शोध घेतला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिभा ठाकरे या नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी कार्यालयात आल्या होत्या. त्याचवेळी महिला शिपाई नियमित कामासाठी कार्यालयात आली असता, तिला प्रतिभा ठाकरे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. सुमारे सकाळी दहा वाजेच्या सुमारास हे लक्षात आलं. त्यांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून कॅम्प पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pratibha Thakare Death
Farmer sends rs51 money order : दुष्काळी मदत 5 हजारांची; शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पाठवले 51 रुपये! अहिल्यानगरमध्ये नेमकं काय घडलं?

प्रतिभा ठाकरे यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या पश्चात मुलगा आणि मुलगी आहे. त्यांचा मुलगा सातारा जिल्ह्यातील लोणंद येथे खासगी शिकवणी वर्ग चालवतो. दरम्यान घटनेच्या आदल्या रात्री त्यांचे जावई महेश भोये यांच्याशी त्यांचे बोलणे झाले होते.

Pratibha Thakare Death
Ravikant Tupkar : कुंभमेळ्याचा निधी दुष्काळग्रस्तांसाठी वापर, शेतकऱ्यांना मदत करा; रविकांत तुपकर आक्रमक

मानसिक दबावामुळे आत्महत्या केल्याचा संशय

सुमारे सहा कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या शहरातील एका पतसंस्थेच्या लेखापरीक्षणाची जबाबदारी प्रतिभा ठाकरे यांच्यावर होती. हे लेखापरीक्षण लवकर पूर्ण करून देण्याचा दबाव त्यांच्यावर होता. यामुळे त्या मानसिक तणावातून त्यांनी टोकाचं पाऊल उचलले असावे, असा संशय ठाकरे यांचे जावई महेश भोये यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. मात्र, या दाव्याची पुष्टी झालेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com