

Malegaon Politics : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महापालिकेत सत्ता स्थापनेला वेग आला आहे. महापौरपदाचे आरक्षण ठरण्याआधीच मालेगावात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. कॉंग्रेसने आता मालेगावात मोठी खेळी खेळली असून इस्लाम पार्टीला अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. इस्लाम पार्टीचे 35, समाजवादी पार्टीचे 5 आणि काँग्रेसचे 3 नगरसेवक मिळून सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेली एकूण 43 जागांची फिगर पूर्ण होत असल्याने इस्लाम पार्टीसाठी सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
अवघ्या दीड वर्षात उभ्या राहिलेल्या माजी आमदार आसिफ शेख यांच्या इस्लाम पक्षाने महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. इस्लाम पक्षाने सर्वाधिक ३५, एमआयएमने २१ तर शिवसेनेने १८ जागांवर यश मिळविले आहे. समाजवादी पक्षाला ५, भाजपला २ तर कॉंग्रेसने तीन जागांवर विजय मिळविला आहे. इस्लाम पार्टीचे 35 व त्यांच्यासोबत युतीत लढलेल्या समाजवादी पार्टीचे 5 अशा चाळीस जागा इस्लामच्या फिक्स आहेत. त्यांना सत्ता स्थापनेसाठी केवळ तीन जागा हव्या आहेत.
त्यासाठी इस्लाम पक्ष व समाजवादी पार्टीच्या सेक्युलर फ्रंटने एमआयएम व कॉंग्रेसकडे बिनशर्त पाठिंबा मागितला होता. इस्लाम पार्टीच्या शिष्टमंडळाने एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांची भेट घेऊन पाठिंब्याबाबत चर्चा केली. तसेच शिवसेनेच्याही १८ जागा आहेत. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांच्या भूमिकेकडेही लक्ष लागून होते. एमआयएम व शिवसेना आपली भूमिका जाहीर करण्याआधीच कॉंग्रेसने डाव टाकत इस्लामला पाठिंबा जाहीर करुन एकप्रकारे ओवेसींच्या AIMIM ला व शिवसेनेच्या अर्थात दादा भुसे यांच्या सत्ता स्थापनेच्या स्वप्नाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला आहे असं म्हणता येईल.
काँग्रेसकडे अवघ्या 3 जागा असतानाही पक्षाने एमआयएमला व शिवसेना शिंदे गटाला दोघांनाही सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी डाव टाकल्याच दिसत आहे. कॉंग्रसने पाठिंबा दिल्याने इस्लाम पक्ष व समाजवादी पार्टीच्या सेक्युलर फ्रंटकडे सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेली ४३ ची मॅजिक फिगर पूर्ण होत आहे. कॉंग्रेसने एकप्रकारे दादा भुसे व ओवीसी यांच्या AIMIM पक्षाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र कॉंग्रेसच्या अटी-शर्ती पाहाता आमदार आसिफ शेख यांची शिवसेना व AIMIM सोबतही चाचपणी सुरु असल्याचं दिसतय.
एजाज बेग यांचे स्टेटस
मात्र या घडामोडी सुरु असतानाच काँग्रेसचे महानगर अध्यक्ष एजाज बेग यांनी ठेवलेल्या व्हाट्सअप स्टेटसमुळे संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. त्यांनी आपल्या दोन्ही हातात दोन खूर्च्या घेत एका खूर्चीवर अडीच वर्षांसाठी Mayor ship व दुसऱ्या खूर्चीवर standing committee chairman असं लिहलं आहे. एकप्रकारे कॉंग्रेसचे एजाज बेग यांनी इस्लामसमोर ठेवलेल्या या अटी बघता या युतीचे काही खरे दिसत नाही. कारण इस्लामने बिनशर्त पाठिंबा मागितलेला आहे.
महापौर पदाचे आरक्षण
मालेगावात नक्की काय होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. त्यात आणखी महापौर पदाच्या आरक्षण सोडतीनंतर येथील समीकरणे पूर्णता बदल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापौरपदाचे आरक्षण काय निघते यावरही अनेक गणितं अवलंबून आहेत. त्यामुळे सध्या तरी महापौर पदाचे आरक्षण ठरत नाही तोपर्यंत नक्की काय ते सांगणे अवघड झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.