Narhari Zirwal
Narhari Zirwal Sarkarnama

Narhari Zirwal : नरहरी झिरवाळांना मुख्यमंत्री फडणवीसांसह पक्षातील नेत्यांवर भरोसा, बदनामीचा कट वाटत नाही

Narhari Zirwal, ACB Bribery Case : राष्ट्रवादीचे नेते, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात एसीबीने मोठी कारवाई केली. लिपीक राजेंद्र ढेरिंगे याला ३५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
Published on

Maharashtra Politics : राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात लिपीक राजेंद्र ढेरिंगे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबीने) ३५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कॉंग्रेस नेत्यांनी या प्रकरणात थेट झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.

दरम्यान, काल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देवगिरी बंगल्यावर कोअर कमिटीची बैठक घेऊन या प्रकरणाबाबत काही मोजक्या सहकाऱ्यांशी चर्चा केली. या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी झिरवाळ यांना स्पष्ट शब्दात स्वत:ची व पक्षाची प्रतिमा मलिन होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचना केल्याचे सूत्रांकडून समजते. सुनेत्रा पवारांशी सोमवारी झालेल्या चर्चेनंतर मंगळवारी झिरवाळ यांनी माध्यमांच्या समोर येऊन या प्रकरणाविषयी पुन्हा भाष्य केलं.

कुणी जाणीवपूर्वक आपल्याबाबतीत कारस्थान करतय का? असा सवाल पत्रकारांनी केला असता झिरवाळ म्हणाले, माझ्याबाबतीत मला एक आत्मविश्वास पक्का आहे. माझी कोणाबरोबरही दुश्मनी, वैमनस्य नाही. कोणी माझा स्पर्धक किंवा कुणाला तरी मी स्पर्धक वाटतो असं काहीही नाही. त्यामुळे माझ्या बाबतीत मला आत्मविश्वास आहे की, मुद्दामून कोणी बदनाम करतय असं वाटत नाही असं झिरवाळ म्हणाले.

Narhari Zirwal
Narhari Zirwal : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून नरहरी झिरवाळांना कडक शब्दात समज.. देवगिरी बंगल्यावर नेमकं काय घडलं?

मधल्या काळात नरहरी झिरवाळ यांचं मंत्रीपद काढून घेण्याची चर्चा होती, त्यासाठी इच्छुक दबाव आणतायत का? असा दुसरा प्रश्न पत्रकारांनी केला असता त्यावर झिरवाळ म्हणाले, अधिकार काढणं आणि दुसऱ्याला देणं हे मुख्यमंत्र्यांच्या कक्षेत येतं. मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत माझं कामकाज बघितलेलं आहे. त्यांच्या मनात माझ्याबाबत किंतु परंतु असल्याचं कधी जाणवलेलं नाही. तसेच माझ्या स्वपक्षातलं कोणी असं करेल असं वाटत नाही. कुणाला तरी माझं मंत्रीपद हवं म्हणून माझी बदनामी करुन माझं मंत्रिपद काढून घेतील असही मला वाटत नाही असं झिरवाळ म्हणाले.

यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी तुमचं बोलणं झालं का? यावर झिरवाळ म्हणाले यावर माझं त्यांच्याशी काही बोलणं झालेलं नाही. पण मी त्यांच्याशी बोलणार आहे. विरोधक म्हणताय की, मंत्रालयात कोणतीही कारवाई करायची झाल्यास मुख्यमंत्री महोदयांना त्याची कल्पना नाही असे नसणार. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांवरुन ही कारवाई केली गेली असा आरोप विरोधक करत आहेत. यावर विचारलं असता झिरवाळ म्हणाले, मला तरी असं वाटत नाही, मुख्यमंत्र्यांनी सूचना केली असेल किंवा हे करायला त्यांचा सपोर्ट असेल असं वाटत नाही. अजिबात मला कुणावरही संशय नाही असं झिरवाळ म्हणाले.

Narhari Zirwal
Nashik NMC : नाशिकमध्ये तिजोरीच्या चाव्या भाजपकडेच, आता सभापती पदासाठी 'ही' तीन नावे चर्चेत..

हा प्रकार कलंक लावणारा

पंरतु मंत्रालयात जो काही प्रकार घडला तो निश्चितच कलंक लावणारा व दयनीय आहे. असे प्रकार इथे होतात याची कल्पना कधीही नव्हती. या प्रकरणाची मी तत्काळ दखल घेत लिपीक राजेंद्र ढेरिंगे यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सध्या ढेरिंगे हे पोलीस कोठडीत असून या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचा गोपनीय अहवाल मला प्राप्त झाल्यानंतर राजेंद्र ढेरिंगे यांच्यावर पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती झिरवाळ यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com