Kirit Somaiya : मालेगावात 1 लाख 26 हजार अदृश्य मतदार? किरीट सोमय्या यांचा आरोप, 7 बीएलओंच्या निलंबनाची मागणी

Kirit Somaiya Malegaon Voter List : मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात १ लाख २६ हजार संशियत मतदारांची नोंद असल्याचा गंभीर आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी केला.
Kirit Somaiya Nashik flood controversy
Kirit Somaiya Nashik flood controversySarkarnama
Published on
Updated on

Malegaon Voter List : मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत सुमारे ५२ टक्के म्हणजेच १ लाख २६ हजार संदिग्ध व अदृश्य मतदारांची नोंद असल्याचा गंभीर आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी केला. या मतदारांची नावे वगळण्याची मागणी त्यांनी केली.

या सर्व प्रकरणांची ८ ऑगस्टपासून प्रत्यक्ष सुनावणी होणार असून, बेनामी मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याबरोबरच संबंधित बीएलओंच्या कामाची चौकशी करून कारवाईची मागणी त्यांनी केली. बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे मतदार नोंदणी झाल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाईसह ३ वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले

अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात एसआयआर प्रक्रियेबाबत चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी, संदिग्ध मतदारांची प्रत्यक्ष सुनावणी होऊन चौकशीअंती त्यांची नावे मतदार यादीतून वगळली जातील, असे सांगितले.

Kirit Somaiya Nashik flood controversy
Kirit Somaiya: 'किरीट सोमय्या हिंदूंचेच...' म्हणत माजी आमदार आसिफ शेख यांचा गंभीर आरोप; केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार

सोमय्या पुढे म्हणाले की, यापूर्वी निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेल्या २३ हजार ५५५ मतदारांची नावे मालेगाव मध्य मतदारसंघातून वगळण्यात आली आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असून, एसआयआर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती होईल असं त्यांनी सांगितलं.

बीएलओंच्या कामाची चौकशी

एकाच व्यक्तीची पाच ते सात ठिकाणी नोंद झाल्याचा आरोप करत, चुकीचे मॅपिंग करणाऱ्या सात बीएलओंना निलंबित करण्याची मागणीही त्यांनी केली. या बीएलओंनी राजकीय पक्षाच्या कार्यालयात बसून मॅपिंग केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे संबंधित बीएलओंनी मतदारांचे मंपिंग कशा पद्धतीने केले, याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे सोमय्या यांनी नमूद केले.

Kirit Somaiya Nashik flood controversy
Bajrang Sonawane : अजितदादांच्या अपघातावर बजरंग सोनवणेंचा संशय कायम; म्हणाले, 'त्या दिवशी पीए...'

राज्यात सुरू असलेल्या मतदार पडताळणी मोहिमेचा उल्लेख करताना जळगाव, खान्देश, विदर्भ आणि मराठवाडत समाधानकारक काम झाल्याचा दावा त्यांनी केला. परंतु, मुंबई, पुणे, नाशिक आणि कोकण विभागात SIR प्रक्रिया संथगतीने सुरू असल्याचे सांगत, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी भाजपचे मालेगाव जिल्हाध्यक्ष नीलेश कचवे, महानगराध्यक्ष देवा पाटील व भाजप कायदा सेलचे शहराध्यक्ष ॲड. योगेश निकम उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com