NCP politics : 'छगन भुजबळांनी पंतप्रधान व्हावे', अजितदादांचा मंत्री काय म्हणाला?

Manikrao kokate chhagan bhujba Ajit Pawar : नाराज छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळावे की नाही तसेच राज्यसभेवर त्यांना संधी कधी मिळणार याविषयी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
Ajit Pawar & Chhagan Bhujbal
Ajit Pawar & Chhagan BhujbalSarkarnama
Published on: 
Updated on: 

NCP politics : नाशिक जिल्ह्यात शिवसेनेचे दादा भुसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ हे तीन मंत्री झाले आहेत. त्यांना चांगली खातीही मिळाली आहेत त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर मंत्रिपद मिळाले नसल्याने छगन भुजबळ नाराज आहेत.

आज (रविवारी) कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे शासकीय विश्रामगृहावर जोरदार स्वागत झाले. यावेळी मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक तसेच विविध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. नवनियुक्त मंत्र्यांच्या स्वागताला राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पदाधिकारी मात्र दिसले नाही. त्यामुळे माजी मंत्री भुजबळ यांचे समर्थक असा शिक्का असलेल्या या पदाधिकाऱ्यांची विशेष चर्चा झाली.

Ajit Pawar & Chhagan Bhujbal
Mahayuti Guardian Minister Allotment : खाते वाटपात कमी-जास्त झालं, आता पालकमंत्री पदांचे वाटप कसं होणार? मंत्री बावनकुळेंनी थेट सांगून टाकलं

भुजबळ यांच्या नाराजविषयी बोलताना कोकाटे म्हणाले, 'त्यांनी मंत्री व्हावे की काय व्हावे हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र मलाही वाटते की भुजबळ यांनी जरासा दम काढला पाहिजे. ते पंतप्रधान व्हावे असं मला वाटतं. मात्र मला जे वाटते ते जगात होईल असे नाही. जशी परिस्थिती आणि जागा निर्माण होईल त्याप्रमाणे भविष्यात निर्णय होऊ शकतील. आम्ही वाट पाहिली त्यांनीही पहावी.'

छगन भुजबळ यांना मंत्रिपदाबाबत कोणी वादा केला होता? हे आपल्याला माहीत नाही. त्यामुळे मंत्रीपद मिळाले नाही म्हणून ते नाराज आहेत, असे चित्र निर्माण झाले मात्र गेली 20 वर्ष आम्ही आमदार आहोत. यंदा पहिल्यांदाच आम्हाला संधी मिळाली, असे देखील कोकाटे यांनी सांगितले.

(Edited By Roshan More)

Ajit Pawar & Chhagan Bhujbal
Shivsena News: शिवसेना नेत्याने सांगितली आतली माहिती; 'मंत्र्यांची दर तीन महिन्यांनी होणार...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.