Mahayuti Guardian Minister Allotment : खाते वाटपात कमी-जास्त झालं, आता पालकमंत्री पदांचे वाटप कसं होणार? मंत्री बावनकुळेंनी थेट सांगून टाकलं

Minister Chandrashekhar Bawankule Guardian Minister post BJP ShivSena NCP party Mahayuti Government : भाजपचे प्रदेशाध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुती सरकारमधील मंत्रि‍पदाचे वाटप आणि पालकमंत्री पदाच्या वाटपावर मोठे भाष्य केले.
Mahayuti Guardian Minister
Mahayuti Guardian MinisterSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : नागपूर अधिवेशनानंतर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाले. आता पालकमंत्री पदांचे वाटप कसे होणार, याकडे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील मंत्र्यांमध्ये पालकमंत्री पदासाठी इच्छुक असलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे महायुतीमधील भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खाते वाटप कसे झाले? अन् पालकमंत्री पदाचे कसे वाटप होणार? यावर प्रतिक्रिया दिली.

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुती (Mahayuti) सरकारच्या मंत्रिमंडळाच्या वाटपावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समतोल साधण्याचा प्रयत्न केला. यात त्यांनी सुलभीकरण साधण्याचा प्रयत्न केला. पण एक गोष्ट करी आहे की, खाते बऱ्या-जास्त करावे लागले, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

Mahayuti Guardian Minister
TOP Ten News : भाजपची 'स्थानिक'च्या निवडणुकीपूर्वी महाअधिवेशनाची तयारी.., पवारांनी फडणवीसांना परभणीचे गांभीर्य सांगितलं.., वाचा महत्त्वाच्या घडामोडी...

राज्यात महायुती सरकारमध्ये भाजपकडे 16 खाते आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका विभागाला दोन मंत्री येतील याची दक्षता घेतल्याचे दिसते. जलसंपदा विभागाचे उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन्ही भाग केले. सुलभीकरणाबरोबरच खात्यांमध्ये सारखे वाटप झाले. काही खात्यांमध्ये कमी-जास्त करावे लागले. त्यामुळे काही खात्यांचे विभाजन दिसते आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

Mahayuti Guardian Minister
Radhakrishna Vikhe : 'ते महाराष्ट्रात येऊन जातील, नंतरची जबाबदारी कोणाची?' राहुल गांधींच्या दौऱ्यावर मंत्री विखेंना वेगळीच भीती!

राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये मंत्री नाहीत, या प्रश्नावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीच्या सरकारमध्ये हे दिसू शकते, असे सांगितले. खाते वाटपाचा महायुतीमधील तिन्ही पक्षांसमोर प्रश्न होते. तरी देखील खाते वाटप योग्य पद्धतीने पार पाडल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

पालकमंत्री पदांचे असे वाटप होणार

"पालकमंत्री पदाच्या वाटपात कोणताही वाद होणार नाही, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आम्ही सर्व एकत्र बसू निर्णय घेतील. या पदांवरून कोणताही वाद होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ. उत्कृष्ट पद्धतीने पालकमंत्री पदांचे वाटप झालेले दिसेल", असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com