

Nashik Maratha Agitation : मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले, मात्र नाशिकच्या आंदोलकांनी कार्यकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे आणि पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांचीबदली रद्द करावी, यावर ठाम राहिले. (Maratha workers are deemands FIR against workers shall be roll back)
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा म्हणून नाशिक (Nashik) येथे उपोषण सुरू करण्यात आले होते. यासंदर्भात आज पोलिसांनी (Police) आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्याव्यात ही मागणी केली आहे.
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा म्हणून नाशिक (Nashik) येथे उपोषण सुरू करण्यात आले होते. यासंदर्भात आज पोलिसांनी (Police) आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्याव्यात ही मागणी केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी काल सायंकाळी राज्य शासनाच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर दोन महिन्यांची मुदत देण्याचे मान्य करीत आपले उपोषण मागे घेण्याची घोषणा केली. त्यांच्या समर्थनार्थ अनेक ठिकाणी उपोषण सुरु होती. नाशिक जिल्ह्यात बावीस ठिकाणी अशी उपोषणे झाली. नाशिक शहरात देखील नाना बच्छाव यांसह कार्यकर्त्यांनी उपोषण केले होते.
आज सकाळी पोलिस व प्रशासनाने नाशिकचे उपोषण मागे घेण्याबाबत चर्चे केली. यावेळी वारकरी संप्रदायाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. पुंडलीक थेटे, विनायक पांडे, करण गायकर, प्रकाश लोंढे, दशरथ पाटील. सुनिल बागूल, विलास शिंदे, तानाजी गायकर आदींनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र राज्य शासनाने घोषणा करून देखील मराठा आंदोलकांवर दाकल केलेले गुन्हे मागे घेतलेले नाहीत, याकडे लक्ष वेधण्यात आले. गुन्हे मागे घेतल्यानंतरच उपोषण मागे घेऊ अशी भूमिका नाना बच्छाव यांनी घेतली होती.
उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या या भूमिकेमुळे प्रशासनाची अडचण झाली. येथील पोलिस निरीक्षकांनी याबाबत पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी शिष्टमंडळाशी चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यावर उपोषण मागे घेण्यात आले. यामध्ये भाजप आमदार सीमा हिरे यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केल्याने भाजपच्या दबावातून सिडको पोलिस ठाण्याचे निरिक्षक वाघ यांची बदली करण्यात आली, अशी चर्चा होती. ती बदली रद्द करण्याची प्रमुख मागणी आंदोलकांची आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.