Manoj Jarange-Patil News : मनोज जरांगे यांची तोफ रविवारी नाशिकमध्ये धडाडणार!

Maratha reservation agitator Manoj Jarange-Patil will visit Nashik on Sunday-मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य शासनाने गांभीर्याने निर्णय घेऊन न्याय द्यावा, यासाठी सुरू आहे दौरा...
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Nashik Maratha News : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यभर वादळ निर्माण करणारे मनोज जरांगे पाटील सध्या राज्यभर दौरा करीत आहेत. रविवारी ते नाशिकला येणार असून, या वेळी ते ओबीसी नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातदेखील सभा घेणार आहेत. त्यामुळे त्यांचा हा दौरा उत्सुकतेचा विषय आहे. (Manoj Jarange-Patil will visits Maratha hunger agitators in Nashik)

नाशिक (Nashik) शहरातील मराठा (Maratha) उपोषणकर्ते व कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जरांगे-पाटील (Manoj Jarange- Patil) नाशिकला येत आहेत. मराठा आरक्षण प्रश्नावर या वेळी ते सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील.

Manoj Jarange Patil
NDCC Bank News : ३४७ कोटींच्या घोटाळ्यात न्यायालयाने सहकारमंत्र्यांचे कान टोचले!

अंतरवाली सराटी (जालना) येथील जरांगे पाटील रविवारी सायंकाळी सहाला नाशिकच्या जिल्हा न्यायालयासमोरील शिवतीर्थावर मराठा उपोषणकर्त्यांची भेट घेणार आहेत. या प्रसंगी ते उपस्थितांना मार्गदर्शन करतील. या वेळी त्यांचे वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात स्वागत करणार आहेत.

शिवव्याख्याते हभप कृष्णा महाराज धोंडगे (दुगावकर) यांचे मराठा आरक्षण या विषयावर कीर्तन होईल. जिल्ह्यातील मराठा बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. समाजाला कुणबी दाखले द्यावेत ही त्यांची प्रमुख मागणी होती. त्यांच्या उपोषणाला देशभरातील समाज बांधवांनी पाठिंबा दिला. उपोषण सुरू असताना उपोषणकर्त्यांवर लाठीमार करण्यात आल्यानंतर ज्या प्रतिक्रिया उमटल्या, त्यामुळे हे आंदोलन चांगलेच गाजले. त्यानंतर राज्य सरकारने त्यात मध्यस्थी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३० दिवसांत राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देतो हा शब्द दिला. त्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले. मात्र, त्याच ठिकाणी साखळी उपोषण सुरू केले. त्याला पाठिंबा म्हणून राज्यात अनेक ठिकाणी साखळी उपोषण सुरू झाली आहेत.

Manoj Jarange Patil
Ajit Pawar News : अजित पवारांसाठी शनिवारी कळवणला शक्तिप्रदर्शन !

नाशिकला नाना बच्छाव, राम खुर्दळ, चंद्रकांत बनकर, नितीन रोठे पाटील, योगेश नाटकर, संजय फड, कैलास खांडबहाले, डॉ. अजित तिदमे, योगेश कापसे, श्रीराम निकम, विकी देशमुख, संजय देशमुख, चंद्रकांत बच्छाव, संदीप खुंटे पाटील, राम गहिरे, शरद लभडे, संदीप बरहे, विकी गायधनी, ज्ञानेश्वर सुरासे, महिंद्र बेहरे, प्रकाश चव्हाण, गणेश पाटील, विशाल निकम, भास्कर पाटील, यासह अनेक कार्यकर्ते साखळी उपोषणात सहभागी झाले आहेत.

Manoj Jarange Patil
Rohit Pawar News : 'बारामती ॲग्रो'च्या प्लांटवरील कारवाई टळल्यानंतर रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांना इशारा; म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com