Nashik Maratha Protest : मंत्री विखे पाटील यांच्या कार्यालयासमोर घातला 'जागरण गोंधळ' ; नाशिकमध्ये मराठा बांधव आक्रमक

Jagran Gondhal protest Radhakrishna Vikhe Patil office in Nashik : नाशिकमधील मराठा बांधव पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. मराठा बांधवांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंत्री विखे पाटील यांच्या कार्यालयासमोर 'जागरण गोंधळ' आंदोलन केलं.
Maratha community members stage a Jagran Gondhal protest outside Radhakrishna Vikhe Patil’s contact office in Nashik over reservation and other pending demands.
Maratha community members stage a Jagran Gondhal protest outside Radhakrishna Vikhe Patil’s contact office in Nashik Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Nashik Maratha Jagran Gondhal protest : मराठा आरक्षणाच्या मागणीसह विविध प्रलंबित प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मराठा बांधवांनी आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नाशिक येथील संपर्क कार्यालयासमोर सोमवार (दि. २८) जागरण गोंधळ आंदोलन केलं. सरकारला जाग यावी या भावनेतून मराठा आंदोलकांनी हे आंदोलन केलं.

SEBC आरक्षण टिकलं पाहीजे ते १० टक्क्यांवरुन १६ टक्के करावं, सारथी संस्थेला आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला प्रत्येकी १ हजार कोटी वर्ग करावे यासह विविध मागण्यासाठी मराठा बांधवांनी हे आंदोलन पुकारलं होतं. या आंदोलनासाठी मराठा क्रांती मोर्चाचे करण गायकर, नानासाहेब बच्छाव, शिवाजी मोरे, नवनाथ शिंदे, आशिष हिरे, शरद तुंगार, सुभाष गायकर यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

९ ऑक्टोबरपासून १० टक्के SEBC आरक्षणाची न्यायालयीन प्रक्रिया सुरू होत असताना सरकारने न्यायालयात कोणती तयारी केली आहे, याची माहिती समाजाला द्यावी, आरक्षणाची बाजू भक्कमपणे मांडावी. तसेच १० टक्के आरक्षणासोबत मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याच्या मागणीवरही सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.

Maratha community members stage a Jagran Gondhal protest outside Radhakrishna Vikhe Patil’s contact office in Nashik over reservation and other pending demands.
Radhakrishna Vikhe Patil : "दुष्काळाची स्थिती, मोठेपणा टाळून साध्या पद्धतीने लग्न करा" : मंत्री विखे पाटलांचे शेतकऱ्यांना आवाहन

राज्यातील EWS आरक्षणाच्या लाभाचा प्रश्नही यावेळी आंदोलकांनी उपस्थित केला. मराठा समाजाला राज्यात अपेक्षित लाभ मिळत नसल्याची भूमिका मांडत शासनाने हा प्रश्न तातडीने सोडवावा. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षण उपसमितीची तातडीने बैठक बोलावून शासनाची स्पष्ट भूमिका समाजासमोर मांडावी तसेच मराठा आंदोलनात सक्रिय असलेल्या प्रतिनिधींनाही बैठकीस निमंत्रित करावे,अशी मागणी करण्यात आली.

सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला प्रत्येकी एक हजार कोटी रुपयांचा निधी तातडीने द्यावा. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात किमान ५०० विद्यार्थी क्षमतेची सुसज्ज वसतिगृहे उभारण्याची प्रक्रिया सुरू करावी. तसेच पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फीचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशा विविध मागण्या मराठा बांधवांनी केल्या.

Maratha community members stage a Jagran Gondhal protest outside Radhakrishna Vikhe Patil’s contact office in Nashik over reservation and other pending demands.
Radhakrishna Vikhe Patil : ‘विखे पाटील मराठाविरोधी’; नाशिकमधून ‘या’ नेत्याने मागितला थेट राजीनामा, जरांगेंनाही आवाहन

मराठ्यांना टेंडरच्या प्रक्रियेत अडकवून ठेऊ नये : गायकर

मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत शासनाने कितीही कालावधी घेतला तरी ज्या मागण्या सरकारच्या अधिकारात आहेत, त्या टेंडर किंवा अनावश्यक प्रशासकीय प्रक्रियेत अडकवून ठेवू नयेत, अशी भूमिका करण गायकर यांनी मांडली. मराठ्यांना टेंडरच्या प्रक्रियेत अडकवून समाजाचा घात करण्यापेक्षा राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्याला मिळालेल्या अधिकाराचा वापर मराठा समाजाच्या उन्नतीसाठी करावा. आता समाजाला आश्वासने नकोत, तर निर्णय आणि प्रत्यक्ष कृती हवी,अशी अपेक्षा करण गायकर यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com