MHADA Scam : तहसीलदाराच्या अटकेनंतर आणखी दोन बडे अधिकारी गळाला; मास्टर माईंड बिपिन काजळे जेरबंद! तब्बल 150 कोटींचा घोटाळा

Kalpesh Patil Bipin Kajale arrested : नायब तहसीलदार नितीन पाटील यांच्या अटकेनंतर पोलिसांनी आणखी मोठी कारवाई केली आहे. भूमि अभिलेखा आणि म्हाडामधील दोन बड्या अधिकाऱ्यांना अटक केली आहे.
Nashik  MHADA
Nashik MHADA Sarkarnama
Published on
Updated on

MHADA FRAUD News: हादरवून टाकणाऱ्या नाशिकमधील म्हाडा सदनिका घोटाळ्यात नायब तहसीलदार नितीन पाटील यांना मागील आठवड्यात अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर या घोटाळ्यातील मास्टर माईंड मोकाटच असल्याचे बोलले जात होते. मात्र, बुधवारी पोलिसांनी मोठी कारवाई करत म्हाडा आणि भूमि अभिलेख विभागाच्या दोन मोठ्या अधिकाऱ्यांना बेड्या घातल्या. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे.

नायब तहसीलदार नितीन पाटील यांची पोलीस कोठडी गुरुवारी संपली. न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. सध्या ते नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात आहेत.

बुधवारी रात्री उशिरा नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक कल्पेश पाटील आणि भूमि अभिलेख विभागाचे उपअधीक्षक बिपिन काजळे यांना अटक झाली. नाशिकच्या गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई करीत दोन मोठे मासे गळाला लावले. या कारवाईने शासकीय प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

प्राथमिक तपासात 31 प्रकरणांमध्ये शासकीय नियम बाजूला सारून फेरफार नोंदी करण्यात आल्या. त्यात एक एकरापेक्षा अधिक भूखंडाचे संभाह्य पोट हिस्से दाखविण्यात आले. या माध्यमातून अधिकाऱ्यांनी मोठा घोटाळा केला आहे. आसनाच्या दुरुस्ती नोंदवहीत मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य घोटाळे झाले. संदर्भात विविध तलाठ्यांनी केलेल्या नोंदणीबाबत धक्कादायक जबाब दिला. त्यातून या प्रकरणाची व्याप्ती अधिक वाढणार याची चिन्हे आहेत.

शासनाला सुपूर्त करायच्या 20 टक्के आर्थिक दुर्बल घटकाच्या सदनिका परस्पर विक्री झाल्या होत्या. यामध्ये विविध शासकीय विभागांना हाताशी धरून बिल्डर मंडळींनी घोटाळा केला. याच्या तपासाला विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी सुरुवात केली आहे.

Nashik  MHADA
Nashik MHADA Scam : दोन तलाठ्यांनीच केला नायब तहसीलदार नितीन पाटलांचा भांडाफोड, आता महसूल विभागाचेही दणाणले धाबे

मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल

नाशिक शहरातील म्हाडा सदनिका घोटाळ्यात दीडशे कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. या संदर्भात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत एसआयटी स्थापन केली.

घोटाळ्याची व्याप्ती विविध विभागांपर्यंत आहे. त्यामुळे पोलिस तपासावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यानंतर याबाबत विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली एस आय टी स्थापन करण्यात आली होती.

बिल्डरांना अभय?

शहरातील प्रतिष्ठित 49 बिल्डर विरोधात दीडशे कोटींच्या घोटाळ्याचा गुन्हा दाखल आहे. मात्र पोलिसांकडून या बिल्डरला हात लावण्याची हिंमत दाखवली गेली नाही. आत्तापर्यंत अवघ्या दोन बिल्डरला अटक झाली होती.

एआयटी स्थापन केल्यानंतर गेल्या आठवड्यात पोलिसांनी नाशिकचे अप्पर नायब तहसीलदार नितीन पाटील यांना अटक केली होती. पाटील यांनी महसूल कागदपत्रांमध्ये नियमबाह्य बदल केले. त्यातून बिल्डर यांना मदत केल्याने आर्थिक लाभ घेतल्याचा आरोप होता.

Nashik  MHADA
Nashik MHADA Scam: धक्कादायक; गरिबांची घरे लाटण्यासाठी बिल्डरांचा प्रताप, खोट्या सह्या बनावट सरकारी शिक्के!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com