Kalyan Lok Sabha 2024: कल्याणमध्ये विकास कुठे दिसत नाही, कार्यअहवालात कळेल त्यांचा विकास; दरेकरांनी शिंदेंची उडवली खिल्ली

Vaishali Darekar on Shrikant Shinde: 'विकासदशक-दहा वर्ष प्रगतीची, कल्याणच्या समृद्धीची' या कार्य अहवालाचा प्रकाशन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी डोंबिवलीमध्ये होणार आहे.
Kalyan Lok Sabha election 2024:
Kalyan Lok Sabha election 2024Sarkarnama
Published on
Updated on

Kalyan News: कल्याण लोकसभा मतदारसंघात (Kalyan Lok Sabha Constituency 2024) महायुतीचे उमेदवार खासदास श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांची लढत शिवसेना ठाकरे गटाच्या कल्याण लोकसभेतील उमेदवार वैशाली दरेकर (Vaishali Darekar) यांच्यासोबत होत आहे.

श्रीकांत शिंदे आपल्या खासदारकीचा कार्यअहवाल आज प्रकाशित करणार आहेत. त्यावरून वैशाली दरेकर यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे.

Kalyan Lok Sabha election 2024:
Madhukar Chavan News: पुत्राच्या भाजपप्रवेशानंतर काँग्रेस सोडणार का? माजी मंत्री मधुकरराव चव्हाण म्हणाले...

"डोंबिवलीत विकास तर काय झालेला दिसत नाही. त्यांनी कार्य अहवाल छापलेला आहे. तो ज्यावेळी बाहेर पडेल, सगळ्यांसमोर प्रकाशित होईल. तेव्हा आम्हालाही कळेल की त्यांनी विकास काय केला ते, अजून तरी आम्हाला तो कुठे दिसत नाही. कार्य अहवालात विकास कोणता दाखवतात ते अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतरच स्पष्ट होईल," असे दरेकर म्हणाल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी गेल्या दहावर्षाच्या कालावधीत मतदारसंघात केलेल्या विकासकामांचा सविस्तर लेखाजोखा कार्य अहवालाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

'विकासदशक-दहा वर्ष प्रगतीची, कल्याणच्या समृद्धीची' या कार्य अहवालाचा प्रकाशन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी डोंबिवलीमध्ये होणार आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com