सुहास कांदेंची आता ‘आमदार आपल्या दारी’ मोहिम

शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी मतदारसंघावरील पकड घट्ट करण्यासाठी जनसंपर्कावर भर दिला आहे.
MLA Suhas Kande News, Nashik News in Marathi
MLA Suhas Kande News, Nashik News in Marathi Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News

नांदगाव : आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांच्या संकल्पनेतून तसेच, शिवसेना (Shivsena) व अंगीकृत संघटना यांच्या सांघिक प्रयत्नातून शिवसेना ‘आमदार आपल्या दारी’ या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यातील नियोजन जाहीर करण्यात आले आहे. यानिमित्ताने आमदार कांदे नांदगाव मतदारसंघावर आपली पकड घट्ट करणार आहे. (MLA Kande will increase political connect in Nandgaon Constituency)

(MLA Suhas Kande News in Marathi)

MLA Suhas Kande News, Nashik News in Marathi
अहिल्यादेवींविषयी उल्लेखाने अनिल गोटे वादात सापडले?

त्याचा प्रारंभ मनमाडमधील बुरकुलवाडी, माऊली नगर, किर्ती नगर, कोतवाल नगर, सिकंदर नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, तिरंगा नगर, गौतम नगर या भागातील नागरिकांपासून येत्या ६ जूनपासून करण्यात येणार असल्याची माहिती आमदारांच्या संपर्क कार्यालयाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.

MLA Suhas Kande News, Nashik News in Marathi
आधी कार्यालयाला कळवा, नंतरच संस्थांना भेटी द्या!

लोकप्रतिनिधी या नात्याने मतदारसंघातील जनतेच्या अडचणी सातत्याने सोडविण्यास प्राधान्यक्रम देत असताना जनता व आमदार यांच्यामधील दरी कमी व्हावी, तळागाळातील समस्या डोळ्याने पाहणे, समक्ष जनतेला भेटून समजून घेणे या प्रामाणिक उद्देशाने आमदार सुहास कांदे हे ‘आमदार आपल्या दारी’ या मोहिमेंतर्गत घरापर्यंत जाऊन नागरिकांना भेटणार आहेत.

नागरिकांच्या समस्या ऐकून घेणार आहेत आणि त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्वरित प्रयत्न करणार आहेत. या मोहिमेप्रसंगी तहसील, पंचायत समिती, नगरपालिका, मंडळ अधिकारी, महावितरण, भुमिअभिलेख, पोलिस स्टेशन, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम, उपजिल्हा रुग्णालय आदी विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार असून, नागरिकांच्या समस्या व संबंधित अधिकाऱ्यांना समोरासमोर चर्चा घडवून समस्यांचे निराकरण केले जाणार आहे.

नागरिकांनी आपल्या समस्या निसंकोचपणे मांडण्यासाठी कार्यक्रमास उपस्थित रहावे, आपल्या समस्यांचे निराकरण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल, असे आवाहन आमदार सुहास कांदे यांनी केले आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com