Suresh Bhole's Thanks Letter To Fadanvis: आमदार भोळे म्हणाले, धन्यवाद फडणवीस साहेब!

रस्त्यांसाठी निधी उपलब्ध केल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आभाराचे पत्र देताना आमदार सुरेश भोळे.
Devendra Fadanvis & Suresh Bhole
Devendra Fadanvis & Suresh BholeSarkarnama
Published on: 
Updated on: 

BJP News: खड्डे व धुळीच्या समस्येतून त्रस्त जळगावकरांची लवकरच सुटका होणार आहे. शहरातील विविध भागांतील रस्त्यांच्या कामांसाठी राज्य शासनाकडून तब्बल १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे रस्त्यांचा गंभीर प्रश्‍न सोडविण्यात आमदार सुरेश भोळे यांना यश आल्याने शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.

जळगाव शहरात (Jalgaon) काही वर्षांपासून रस्त्यांची (Roads) अत्यंत वाईट अवस्था झाल्याने शहरवासीयांसाठी रस्ते डोकेदुखी ठरले होते. अनेक भागांतील छोट्या-मोठ्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे, तसेच त्यावरील धुळीमुळे जळगावकर अक्षरशः त्रस्त झाले होते. शहरवासीयांची या समस्येतून कायम सुटका करण्याच्या दृष्टीने आमदार सुरेश भोळे (MLA Suresh Bhole) यांनी शासनदरबारी सुरवातीपासूनच पाठपुरावा केला होता.

Devendra Fadanvis & Suresh Bhole
Girish Mahajan's Statement : गिरीश महाजन म्हणतात, पुढची २५ वर्षे चिंता नसेल!

त्यानुसार, तब्बल शंभर कोटींचा निधी मंजूर झाला आहे. शासनाच्या नगर मंत्रालयाकडून बुधवारी याबाबतचा शासन निर्णय महापालिकेला प्राप्त झाला आहे. या निधीतून सर्व रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम ‘अंबरनाथ पॅटर्न’प्रमाणे केले जाणार आहे.

यापूर्वी शहरातील मुख्य बाजारपेठ भागातील सहा रस्त्यांसाठी ८७ कोटी रुपयांचा निधी आमदार भोळे यांनी मंजूर करून आणला होता. आता उपनगर व कॉलनी भागातील रस्त्यांची कामे लवकरच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केली जातील.

Devendra Fadanvis & Suresh Bhole
Pankaja Munde News: मुंडे भगिनींच्या मनात नेमकं तर चाललंय तरी काय..?बीडमधील सावरकर गौरव यात्रेला दांडी

या प्रमुख रस्त्यांचा समावेश

प्रभाग तीन ‘ब’मधील संपूर्ण रस्ते, खेडी गावातील रस्ते, जोशी पेठ, विठ्ठल पेठ, मेहरूण, नेहरूनगर, मोहाडी रोड, चंद्रलोक अपार्टमेंट परिसर, चंदनवाडी, बालाजी पेठ, जुने जळगाव, शनिपेठ परिसरातील रस्ते, आदर्शनगर, तांबापुराचा भाग, रामेश्वर कॉलनी, हनुमान मंदिर परिसर, स्वामी समर्थनगर, गणेशवाडी, मंजूषा सोसायटी, रूपपगंगा कॉलनी आदी बेचाळीस रस्त्यांच्या त्यात समावेष आहे. (Latest Maharashtra News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.