Madhya Pradesh News: भाजप भाकरी फिरवणार! 5 ते 6 मंत्र्यांना डच्चू, मोहन यादव मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांची एन्ट्री?

Madhya Pradesh Cabinet Reshuffle News: मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या नेतृत्वाखालील मध्य प्रदेश सरकारमध्ये मोठ्या मंत्रिमंडळ फेरबदलाची शक्यता आहे. काही विद्यमान मंत्र्यांना वगळून नव्या, युवा आणि महिला चेहऱ्यांना संधी मिळू शकते.
CM Mohan Yadav
CM Mohan YadavSarkarnama
Published on
Updated on

 Madhya Pradesh Politics: मध्य प्रदेशातील भाजप सरकारमध्ये लवकरच मोठा मंत्रिमंडळ फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यानंतर हा पहिलाच मोठा फेरबदल असू शकतो.

पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार, जून महिन्याच्या अखेरीस मंत्रिमंडळात बदल होण्याची शक्यता असून काही विद्यमान मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो, तर नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

सध्या मध्य प्रदेश मंत्रिमंडळात एकूण ३१ सदस्य आहेत. आगामी फेरबदलात ५ ते ६ मंत्र्यांना डच्चू मिळू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यामध्ये आदिवासी कल्याण मंत्री विजय शाह, पंचायत राज मंत्री राधा सिंह, राज्यमंत्री प्रतिमा बागडी आणि वन राज्यमंत्री दिलीप अहिरवार यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, याबाबत पक्षाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

CM Mohan Yadav
Jalgaon MLC Election: जळगाव विधान परिषदेची जागा कोणाला? गुलाबराव पाटील यांच्या दाव्याने भाजपमध्ये खळबळ

दुसरीकडे, मंत्रिमंडळात ७ ते ८ नव्या चेहऱ्यांना स्थान मिळू शकते. सागर जिल्ह्यातील आमदार शैलेंद्र जैन किंवा प्रदीप लारिया यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रमुराम चौधरी यांच्याही नावाची चर्चा आहे. माजी मंत्री बृजेंद्र प्रताप सिंह यांनाही पुन्हा संधी मिळू शकते. याशिवाय महिला, युवा आणि आदिवासी समाजातील प्रतिनिधींना मंत्रिमंडळात स्थान देण्यावर पक्ष नेतृत्वाचा भर असल्याचे सांगितले जात आहे.

CM Mohan Yadav
महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘लेडी पॉवर’; कोण आहेत चर्चेतल्या नेत्या?

मागील काही आठवड्यांमध्ये मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिल्लीच्या अनेक भेटी दिल्या आहेत. या दौऱ्यांदरम्यान त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. १९ मे रोजी झालेल्या बैठकीत वरिष्ठ नेत्यांसोबत राज्यातील राजकीय परिस्थिती आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

CM Mohan Yadav
Maharashtra Teacher Recruitment News: रखडलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेला अखेर गती; पवित्र पोर्टलसाठी नवी मुदतवाढ

राजकीय सूत्रांच्या मते, जूनच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात काही मंत्र्यांचे राजीनामे घेतले जाऊ शकतात. त्यानंतर नव्या मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, वरिष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांची राज्यसभेसाठी निवड होण्याची चर्चा आहे, तर प्रल्हाद सिंह पटेल यांना पक्ष संघटनेत महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते.

या संभाव्य फेरबदलामुळे मध्य प्रदेशातील भाजपच्या राजकारणाला नवे वळण मिळण्याची चिन्हे दिसत असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना आणि सरकारमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com