

Nandurbar News: नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळाची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. बहुतांश पाणीपुरवठा योजना बंद पडलेल्या आहेत. आदिवासींचे गुजरातमध्ये स्थलांतर सुरू आहे. त्यामुळे राजकीय नेते दुष्काळाच्या प्रश्नावर सक्रिय झाले आहेत.
गेल्या आठवड्यात पालकमंत्री हसन मुश्रीफांनी व्हीसीद्वारे नंदुरबार प्रशासनाला दुष्काळाच्या उपाययोजनांबाबत कडक इशारा दिला होता. त्यामुळे अधिकारी दुष्काळाच्या उपाययोजनांसाठी सक्रिय झाले होते. मात्र आदिवासींना अद्याप दिलासा मिळालेला नाही.
आता या प्रश्नावर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षही सक्रिय झाला आहे. आमदार आमश्या पाडवी यांनी अक्रानी आणि अक्कलकुवा अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीला शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचाच भरणा अधिक होता. या पदाधिकाऱ्यांनी प्रशासना विरोधात तक्रारींचा पाढा वाचला.
त्यामुळे आमदार पाडवी यांनीही तहसीलदार मनोज कुमार ऐतवाडे आणि गटविकास अधिकारी पूजा गायकवाड यांना थेट इशाराच दिला आहे. पाणीपुरवठा योजना तातडीने सुरळीत कराव्यात. निष्क्रिय अधिकाऱ्यांना थेट घरी पाठवावे असा इशारा त्यांनी दिला.
आमदार पाडवी यांच्या या इशाऱ्याने नंदुरबार जिल्ह्यातील राजकारण पुन्हा चर्चेत आले आहे. पाणीपुरवठा मंत्री शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे गुलाबराव पाटील तर पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे हसन मुश्रीफ आहेत. दुसरीकडे भाजपचे माजी पालकमंत्री विजयकुमार गावित हे देखील प्रशासनाच्या बैठका घेत आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात सत्ताधारी महायुतीतच तिन्ही पक्षाच्या लोकप्रतिनिधींमध्ये दुष्काळाच्या प्रश्नावरून स्पर्धा सुरू झाली आहे. प्रत्यक्षात मात्र आदिवासी नागरिकांमध्ये प्रशासनाबाबत फारसा विश्वास नाही. त्यामुळे उपाययोजना करूनही रोजगारासाठी मोठ्या प्रमाणावर गुजरातमध्ये स्थलांतर सुरू झाले आहे.
या परिस्थितीत अधिकारी चांगलेच गोंधळलेले आहेत. सत्ताधारी पक्षाकडूनच प्रशासनाला इशारे दिले जात आहेत. त्यामुळे प्रशासन आणि सत्ताधारी पक्षातील नेते यांच्यातील विसंवाद वाढतो की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.