BJP Politics: विकासाचा गवगवा करणाऱ्या भाजपने विकासनिधीच रोखला, आक्रमक नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांनी उपसले उपोषणाचे अस्त्र!

Nandurbar Shahada President Abhijit Patil Minister Hassan Mushrif hunger strike BJP Politics- भाजप आणि नगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्या राजकीय वादात शहादा शहर वेठीस; विकासकामांचा निधी रोखल्याने नगराध्यक्षांची कोंडी
Abhijit Patil, Shahada
Abhijit Patil, ShahadaAbhijit Patil, Shahada
Published on: 
Updated on: 

Abhijit Patil News: गल्लीपासून दिल्लीपर्यंत निवडणुकीत विकास आणि ट्रिपल इंजिन सरकारचा भाजपचा दावा असतो. मात्र नंदुरबार जिल्ह्यात भाजपने वेगळाच राजकीय डाव टाकला आहे. जनतेने नाकरल्याने भाजपने शहादा नगरपालिकेची राजकीय कोंडी झाली.  

शहादा नगरपालिकेत अभिजीत पाटील हे अपक्ष नगराध्यक्ष सत्तेत आहेत. निवडणुकीत त्यांच्या जनता विकास आघाडीचे नऊ तर भाजपचे २० नगरसेवक आहेत. बहुसंख्या नगरसेवक असूनही नागरिकांनी अपक्ष अभिजीत पाटील यांना थेट नगराध्यक्षपदी निवडून दिले. त्यात भाजप उमेदवाराचा पराभव झाला.  

अपक्ष अभिजीत पाटील नगराध्यक्ष झाल्याने भाजपच्या नेत्यांचे पित्त खवळले. त्यांनी नगराध्यक्ष पाटील यांची राजकीय कोंडी करण्यासाठी मोठा डाव टाकला. आता त्यात या शहराची चांगलीच राजकीय कोंडी झाली आहे. 

Abhijit Patil, Shahada
Nandurbar Politics : हक्काच्या जागेवर दावा सांगितला, भाजपच्या हिना गावितांनी शिंदेंच्या आमदाराला तरी घेतलं हलक्यात, काय म्हणाल्या?

नंदुरबार जिल्ह्यातील चारही नगरपालिकांना जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी मिळाला. मात्र शहादा नगरपालिकेची राजकीय कोंडी करण्याच्या नादात निधी रोखण्यात आला. त्यामुळे शहादा नगरपालिकेला एक रुपयाही विकासासाठी मिळाला नाही. 

Abhijit Patil, Shahada
Shahada Tehsildar News: तहसीलदारांच्या पत्नीचा अजब कारनामा! घरचा किराणा आणण्यासाठी वापरली सरकारी गाडी

नगराध्यक्ष पाटील यांनी शहराचा विविध विकास कामांसाठी १५ कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव एकमताने सभागृहात मंजूर केला. त्याला भाजप सह सर्व नगरसेवकांनी संमती दिली. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांसह भाजपचे स्थानिक आमदार राजेश पाडवी व सर्वपक्षीय नेत्यांना हा प्रस्ताव देण्यात आला होता. 

हा प्रस्ताव देऊनही जिल्हाधिकारी स्तरावरील काहीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. दुर्दैवाने या उपोषणाला नगरसेवकांनी मात्र दांडी मारली. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी काँग्रेसचे आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र कुमार गावित, समाजवादी पक्षासह विविध पक्षाच्या नेत्यांनी उपोषणाला पाठिंबा दिला.

जिल्हाधिकारी डॉ मिताली शेट्टी यांनी नगराध्यक्ष पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले. मात्र भाजपने व सत्ताधारी पक्षाने राजकारण सोडून लोकशाहीचा आदर करावा. शहादा शहराच्या विकासात अडथळेने आणता निधी उपलब्ध करून द्यावा. अन्यथा पुन्हा उपोषण केले जाईल असा इशारा नगराध्यक्ष पाटील यांनी दिला आहे. 

नंदुरबार जिल्ह्यात भाजप विरुद्ध अन्य राजकीय पक्ष यांच्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. खासदार काँग्रेसचे तर आमदार भाजपचे. त्यामुळे महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडूनही भाजपवर सापत्न वागणूक दिल्याचा आरोप केला जात आहे. आता हे राजकारण थेट उपोषणापर्यंत पोहोचले आहे. 

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com