

Tribal drought migration: उन्हाळा त्यातही दुष्काळ त्यामुळे महाराष्ट्राच्या सीमेवरील आदिवासी भागात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. आदिवासींचे मोठ्या प्रमाणावर गुजरातला स्थलांतर सुरू झाले आहे. या स्थलांतरामागे महिलांची मोठी भूमिका असल्याचे पुढे आले आहे.
नाशिकसह धुळे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींचे उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर रोजगारासाठी गुजरातला स्थलांतर होते. या स्थलांतरामागे महिलांची मोठी भूमिका असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मंत्र्यांपासून सरकारपर्यंत सगळ्यांचे स्थलांतर रोखण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले.
सध्या दुष्काळ असल्याने महाराष्ट्राच्या गुजरात सीमेवरील आदिवासी भागात गंभीर स्थिती आहे. पाणीटंचाई आणि रोजगार याची गंभीर स्थिती आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरू झाले आहे.
आदिवासींचे गुजरातकडे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी नंदुरबार येथे "मूळवाट स्थलांतर नियंत्रण कक्ष" स्थापन करण्यात आला आहे. या कक्षा द्वारे आदिवासींना तातडीने रोजगार आणि अन्य सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. स्थलांतर रोखणे हा त्याचा मुख्य हेतू आहे.
मात्र विविध मंत्र्यांनी व्यक्तिगत लाभाच्या योजनांसह अनेक प्रकल्प राबवूनही स्थलांतर थांबलेले नाही. त्यामागे महिलांची वेगळीच भूमिका पुढे आली आहे. महिलांमुळेच मोठ्या प्रमाणावर आदिवासी गुजरातला स्थलांतरित होत असल्याचे स्पष्ट झाले.
महाराष्ट्रात मुबलक प्रमाणात दारू उपलब्ध होते. आदिवासींना दारू काढण्याचे अधिकार देखील आहेत. त्यामुळे आदिवासी भागात उन्हाळ्यात काम नसल्याने दारूच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढते. त्याचा कौटुंबिक स्थितीवर परिणाम होतो.
यातून आदिवासी नागरिकांची सुटका करण्यासाठी आदिवासी महिला पुरुषांना रोजगारासाठी गुजरातमध्ये जाण्यास प्रवृत्त करतात. गुजरातमध्ये दारूबंदी आहे. कामाचे पैसे शेवटी मिळतात. त्यामुळे हंगामात रोजगारासाठी गुजरातला गेल्यावर परत येताना संबंधित आदिवासींकडे पैसे जमा होतात. त्याचा उपयोग संसार उपयोगी साहित्य खरेदी आणि पावसाळ्यात शेतीला होतो. शिवाय आदिवासी पुरुष दारूपासून दूर राहतात. त्यामुळे महिला आपल्या कुटुंबातील सदस्यांना रोजगारासाठी गुजरातमध्ये घेऊन जातात.
गुजरातमध्ये दारूबंदी आहे. त्यामुळे व्यसनांपासून दूर राहून चार पैसे शिल्लक राहतात म्हणून आदिवासी महिला पुरुषांना रोजगारासाठी गुजरातमध्ये घेऊन जातात. या उलट गर्भश्रीमंत आणि पर्यटक मात्र महाराष्ट्रात दारू मुबलक असल्याने सीमेवरील भागात पर्यटनाला येतात. अशी विचित्र स्थिती दारूबंदीमुळे निर्माण झाली आहे. त्यामुळे स्थलांतर रोखण्यासाठी राजकीय नेत्यांनी केलेले सर्व प्रयत्न महाराष्ट्रात यशस्वी होत आहेत.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.