

Nashik News : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे यांनी अन्नातील भेसळीविरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. मुंडे यांच्या पथकाकडून राज्यातील विविध शहरांत धाडी टाकल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ हे देखील आता अॅक्शन मोडवर आले आहेत.
मंत्री नरहरी झिरवाळ यांनी शुक्रवार (दि. १९) नाशिक शहरातली दूध बाजारात भल्या सकाळी छापा टाकला. यावेळी झिरवाळ यांच्याकडून दूध बाजारात विक्री होणाऱ्या दुधाची तपासणी करण्यात आली. दूध विक्रेत्यांकडील दुधाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. विशेष म्हणजे नरहरी झिरवाळ यांचा आज वाढदिवस असून त्यानिमित्ताने त्यांनी दिवगंत नेते अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अजित पवार हे ज्याप्रमाणे सकाळी उठून काम करत होते, तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून नरहरी झिरवाळ यांनी आज सकाळपासून कामाला सुरुवात केली आहे. नाशिक शहरातील आणखी दोन - तीन ठिकाणी त्यांनी छापा मारला, त्या ठिकाणी त्यांना भेसळ आढळून आलेली नाही. कुठल्याही त्रुटी प्राथमिक तपासणीमध्ये आढळून आल्या नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. या विशेष मोहिमेत अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच डेअरी विकास विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते.
दूध व दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता, शुद्धता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी नमुन्यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. ग्राहकांना भेसळमुक्त व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, तसेच अन्न सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मंत्री झिरवाळ म्हणाले.
जनतेच्या आरोग्याशी संबंधित कोणत्याही प्रकारची तडजोड सहन केली जाणार नाही. अन्न सुरक्षा व ग्राहक संरक्षणासाठी अशा तपासणी मोहिमा राज्यभर सातत्याने राबविण्यात येतील असे मंत्री झिरवाळांनी सांगितले.
दरम्या तुकाराम मुंडे यांच्यासह एफडीएच्या पथकाने राज्यभरात राबवलेल्या या कारवाईच्या सत्रामुळे भेसळी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. तसेच या कारवायांची राज्यभर चर्चा असून नागरिकांकडून स्वागत केलं जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.