Nashik Ashram Shala : सृष्टीच्या मृत्यूचे 'डेथ ऑडिट ', नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचे जिल्हा शल्यचिकित्सकांना आदेश

Srishti Death Audit : सृष्टीच्या मृत्यूचे 'डेथ ऑडिट करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले आहेत. या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची त्रुटी अथवा अनियमितता आढळल्यास थेट कारवाई होणार आहे.
Visapur Ashram School, Srishti Death Audit
Visapur Ashram School,Srishti Death AuditSarkarnama
Published on
Updated on

Nashik Ashram Shala student Srishti Suryawanshi death : नाशिकच्या कळवण तालुक्यातील विसापूर आश्रमशाळेतील आठ वर्षीय विद्यार्थिनी सृष्टी सूर्यवंशी हिच्या मृत्यूचे ऑडिट करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले आहेत.

या डेथ ऑडिटमध्ये विद्यार्थिनीचा जन्मापासून आजपर्यंतचा संपूर्ण आरोग्य इतिहास, तसेच मृत्यूपूर्वीच्या २४, ४८ आणि ७२ तासांतील आरोग्यस्थिती, करण्यात आलेले उपचार, औषधोपचार आणि वैद्यकीय नोंदी यांची सखोल तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची त्रुटी अथवा अनियमितता आढळल्यास त्याबाबत नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल. यासोबतच, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी विद्यमान आरोग्यविषयक कार्यपद्धती व प्रमाणबद्ध औषधोपचार यासाठी आवश्यक सुधारणा करता येतील का, याचाही आढावा घेण्यात येणार आहे.

Visapur Ashram School, Srishti Death Audit
Education Department : दादा भुसेंच्या खात्याचे अधिकार झाले ‘डिसेंट्रलाइज’; भाजपचा ‘सर्जिकल स्ट्राइक’ असल्याची महायुतीत चर्चा

नेमकं प्रकरण काय?

कळवण तालुक्यातील विसापूर येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत दुसरीत शिकणाऱ्या सृष्टी ओंकार सूर्यवंशी (वय ८, रा. गोळवाड, ता. बागलाण) या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी कळवण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून, पालकांनी आश्रमशाळा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुख्याध्यापक, अधीक्षक व संबंधित शिक्षकांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. (Nashik News)

सृष्टीला ३ सप्टेंबरला ताप व उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने तिला मोकभणगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले होते. उपचारानंतर तिला पुन्हा आश्रमशाळेत आणण्यात आले. मात्र, ४ सप्टेंबरला रात्री पुन्हा प्रकृती बिघडल्याने साडेबाराच्या सुमारास तिला कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पहाटे २.२७ ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. या प्रकरणी कळवण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. नाशिक शहरात आदिवासी विद्यार्थांचे आंदोलन निर्णायक वळणावर असताना घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.

Visapur Ashram School, Srishti Death Audit
Radhakrishna Vikhe Patil : ‘विखे पाटील मराठाविरोधी’; नाशिकमधून ‘या’ नेत्याने मागितला थेट राजीनामा, जरांगेंनाही आवाहन

पालकमंत्र्यांकडून आढावा...

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी विसापूर येथील परिस्थितीचा आढावा आमदार नितीन पवार, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड, प्रकल्प अधिकारी कश्मीरा संखे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश शिंपी तसेच संबंधित वैद्यकीय अधिकारी यांचेकडून घेतला आहे. तालुक्यातील काही शासकीय आश्रमशाळांमधील एकूण ३४ विद्यार्थी उपचारासाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी कळवण उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. उपचार घेणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून आवश्यक ते उपचार सुरू ठेवण्याच्या तसेच आवश्यक चाचण्या करून घेण्याच्या सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

पाच लाखांचे अनुदान...

या घटनेच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभागाकडून विद्यार्थिनीच्या कुटूबियांना पाच लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com