Girish Mahajan addressing media while responding to former MP Unmesh Patil’s likely entry into the Eknath Shinde-led Shiv Sena faction.
Girish Mahajan addressing media while responding to former MP Unmesh Patil’s likely entry into the Eknath Shinde-led Shiv Sena faction.sarkarnama

Girish Mahajan: उन्मेश पाटलांच्या शिवसेना प्रवेशावर मंत्री महाजनांची खोचक प्रतिक्रिया; म्हणाले, 'त्यांना आम्ही हाकलले,आता...'

Unmesh Patil joining ShivSena : माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या शिंदे गटात प्रवेशावर गिरीश महाजन यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. महाजन म्हणतात, त्यांना आम्ही हाकलले, आता बरेच पक्ष बदलावे लागतील! त्यांच्या प्रवेशाला विशेष महत्त्व नसल्याचे त्यांनी सांगितले.
Published on

Unmesh Patil News : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार उन्मेश पाटील पक्षाला जय महाराष्ट्र करणार आहेत. एक दोन दिवसात ते शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश करती. त्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठे फेरबदल पाहायला मिळणार आहेत.

माजी खासदार उन्मेश पाटील यांना भाजपने लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारली. त्यानंतर उन्मेश पाटील यांनी भारतीय जनता पक्ष सोडला. त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीत त्यांनी रावेर मतदार संघातून स्वतः उमेदवारी केली नाही. मात्र विश्वासू सहकाऱ्याला उमेदवारी मिळवून भाजपला मोठे आव्हान निर्माण केले होते. मात्र त्या निवडणुकीत भाजप उमेदवार विजयी झाला.

त्यानंतर विविध प्रश्नांवर माजी खासदार पाटील यांनी भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. विशेषतः पाण्याच्या प्रश्नावर त्यांनी जळगावमध्ये मोठे आंदोलन उभे केले होते. विधानसभा निवडणुकीतही त्यांनी जनतेचा कौल घेऊन पाहिला होता.

Girish Mahajan addressing media while responding to former MP Unmesh Patil’s likely entry into the Eknath Shinde-led Shiv Sena faction.
Unmesh Patil : भाजप ही गांडूळाची...' जळगावमधील उद्धव ठाकरेंचा नेता घराणेशाहीवरुन घसरला..

आता माजी खासदार पार्टी महायुतीचा घटक असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. हा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला धक्का आहे. त्याचबरोबर भाजप आणि मंत्री गिरीश महाजन यांनाही आव्हान देण्याचा प्रयत्न आहे.

Girish Mahajan addressing media while responding to former MP Unmesh Patil’s likely entry into the Eknath Shinde-led Shiv Sena faction.
Jalgaon Mahapalika News: सत्ताधारी भाजपवर आली आंदोलनाची वेळ; नव्या वादाला प्रारंभ

त्या पार्श्वभूमीवर मंत्री महाजन यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही त्यांना पक्षातून हाकलेले आहे. त्यानंतर त्यांची काय स्थिती झाली हे सगळे पहात आहेत. भाजप पक्ष सोडल्यावर काय स्थिती होते हे आता उन्मेश पाटील यांना पहायला मिळाले असेल. अजून त्यांना बरेच पक्ष बदलावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशाला आम्ही विशेष महत्त्व देत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com