BJP NMC Politics: भाजप सभागृहनेता निवड रखडली; आमदारांनी केला प्रतिष्ठेचा प्रश्न?

BJP NMC group leader selection delayed: महापालिका सभागृह नेतेपदी भाजप कोणाला देणार संधी याची उत्सुकता वाढली!
Sudhakar Badgujar, Girish Mahajan & Gurmitsingh Bagga
Sudhakar Badgujar, Girish Mahajan & Gurmitsingh BaggaSarkarnama
Published on
Updated on

Nashik BJP internal conflict news: नाशिक महापालिकेत बहुतांशी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पार पडल्या. आता अंदाजपत्रक सादर झाले आहे. मात्र सभागृह नेत्यांची निवड अद्यापही रखडल्याने तो चर्चेचा विषय आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने विरोधी पक्षनेतेपदासाठी प्रथमेश गीते यांच्या नावाचे शिफारस केली आहे. ही शिफारस महापौरांना सादर झाली तरीही त्याची घोषणा होऊ शकली नाही. त्याला भाजप पक्षातील राजकारण आडवे आले आहे.

भाजपने महापौर स्थायी समिती सभापती आणि गटनेते पदासाठी यंदा तरुण सदस्यांना संधी दिली आहे. महापौर पदी हिमगौरी अडके यांचे नियुक्ती झाली आहे. त्यामुळे आता सभागृह नेतेपदासाठी अनुभवी सदस्याचा शोध सुरू आहे.

Sudhakar Badgujar, Girish Mahajan & Gurmitsingh Bagga
Muslim protests : इराणचे खामेनेई यांचा मृत्यू; संग्राम जगतापांची 'अजब-गजब' प्रतिक्रिया चर्चेत!

भाजपाला सध्या तरी पक्षातून अनुभवी नगरसेवक उपलब्ध होताना दिसत नाही. त्यामुळे दिनकर पाटील, सुधाकर बडगुजर, गुरमीतसिंग बग्गा या अन्य पक्षातून आलेल्या नेत्यांच्या नावाची चर्चा आहे. यामध्ये सध्या तरी सुधाकर बडगुजर आणि बग्गा यांचे नाव आघाडीवर होते.

Sudhakar Badgujar, Girish Mahajan & Gurmitsingh Bagga
Iran- US war:घाबरू नका आम्ही आहोत, आखातात अडकलेल्या जळगावकरांना मंत्री गुलाबराव पाटील यांचा दिलासा!

मात्र सभागृह नेते पदासाठी आपल्या पक्षांतर्गत विरोधकांना ताकद मिळणार नाही याची दक्षता भाजप आमदार घेत आहेत. भाजपा आमदारांच्या आगामी राजकारणाच्या आणि सोयीच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहे. त्यामुळे सभागृह नेतेपदी कोण? यामध्ये आमदारांनी उडी घेतल्याचे बोलले जाते.

सध्या स्पर्धेत असलेल्या सुधाकर बडगुजर आणि गुरमीतसिंग बग्गा यांच्यात एक आमदाराचा श्री बघा यांच्या नावासाठी आग्रह आहे. तर दुसऱ्या आमदाराचा बडगुजर यांच्या नावाला प्रखर विरोध आहे. सभागृह नेतेपद महत्त्वाचे असल्याने भाजपच्या आमदारांनी तो विषय प्रतिष्ठेचा केला आहे. या वादात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन काय निर्णय घेतात याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.

भारतीय जनता पक्षातील अंतर्गत राजकारण आणि सभागृह नेतेपदाच्या नियुक्तीत आमदारांनी घेतलेला पडद्यामागील सहभाग हा कळीचा मुद्दा बनला आहे. सभागृह नेते पदाची घोषणा त्यामुळेच रखडले आहे.

त्याचा परिणाम म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या प्रथमेश गीते यांना फटका बसला आहे. विरोधी पक्ष नेत्यांची निवड लांबणीवर पडली आहे. यामध्ये भाजप आमदार आणि नेत्यांमध्ये एकमत कसे होईल? केव्हा होईल? याची सगळ्यांना उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com