

CM Devendra Fadnavis On Nashik accident : नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावात शुक्रवार (दि. ३) रात्री भीषण अपघात झाला. भरधाव कार रस्त्याच्या मधोमध असलेल्या विहिरीत कोसळल्याने एकाच कुटुंबातील तब्बल 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बंद काचांमुळे गाडीतील लोक बाहेर पडू शकले नाहीत. या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
दरगोडे कुटुंबीय मुलांच्या खासगी क्लासच्या स्नेहसंमेलनासाठी बाहेर पडलं होतं. शुक्रवारी रात्री दहा वाजता दिंडोरी शहरातील शिवाजीनगर परिसरात दरगोडे कुटुंबाची इर्टिका कार विहिरीत कोसळली. या घटनेनंतर तत्काळ बचाव कार्य हाती घेण्यात आलं. पण विहिरीत पाणी अधिक होतं, त्यात अंधार होता त्यामुळे मदतकार्यात अडथळा निर्माण झाला. दुर्देवाने कुटुंबातील ९ जणांचा या अपघातात मृत्यू झाला.
विहीर बुजवण्याचे आदेश
मिळालेल्या माहितीनुसार मृतांमध्ये ६ विद्यार्थी तर ३ पालकांचा समावेश आहे. येथील राजू राजे यांच्या विहिरीत ही कार कोसळली. याप्रकरणी विहीर मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळाची पाहणी करत तत्काळ ही विहीर बुजवण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान सकाळी मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मृतांच्या कुटुंबियाचे सात्वंन करण्यासाठी भेट दिली. मात्र यावेळी झिरवाळ यांना घेराव घालत संतप्त नातेवाईकांनी या निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थितीत केला. विहिर मालकाने घराला कंपाउंड केलं मग विहिरीला का केलं नाही? तसेच नगरपालिकेने रस्ता विहिरीपर्यंत नेऊन तिथेच संपवला, तिथे संरक्षण भिंत असणे आवश्यक होते असं मंत्री झिरवाळ म्हणाले.
काय म्हणाले फडणवीस?
दरम्यान या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत दु:ख व्यक्त केलं. अतिशय दुर्दैवी आणि मनाला वेदना देणारी ही घटना असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मंत्री गिरीश महाजन यांच्याशी मी चर्चा केली असून त्यांनी घटनास्थळी भेट दिली आणि ते समन्वय साधून आहेत. मृतांच्या वारसांना ₹5 लाख आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश सुद्धा जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.