Nashik Catch the Rain : नाशिकच्या 'कॅच द रेन' उपक्रमाचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक, त्यावर CM फडणवीसांचेही आवाहन, नक्की काय आहे हा उपक्रम?

PM Modi Appreciates Nashik's Catch the Rain Initiative : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' केली. या उपक्रमात नाशिक जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या जलसंवर्धन उपक्रमाची त्यांनी दखल घेत उल्लेख केला.
PM Modi praises Nashik Catch the Rain
PM Modi praises Nashik Catch the RainSarkarnama
Published on
Updated on

Nashik water conservation campaign: नाशिक जिल्ह्यातील जलसंवर्धनाच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या ‘कॅच द रेन’ उपक्रमाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' मधून संवाद साधला. या उपक्रमात नाशिक जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या जलसंवर्धन उपक्रमाची त्यांनी दखल घेत उल्लेख केला. नाशिक जिल्हावासीयांसाठी ही एक अभिमानाची बाब आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यात कॅच द रेन (Catch the Rain) अभियान राबविण्यात येत आहे. त्यात लोकसहभाग, विभागीय समन्वय आणि विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे जलसुरक्षा बळकट करण्यात येत आहे.

यामध्ये जलयुक्त शिवार अभियान २.०, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजना, नाला खोलीकरण व रुंदीकरण, कृत्रिम भूजल पुनर्भरण विहिरी (रिचार्ज शाफ्ट), पर्जन्यजल संधारण, सूक्ष्म सिंचन, जलअर्थसंकल्प (वॉटर बजेटिंग), जलकार्यक्षम शेती तसेच जलतारा यांसारख्या उपक्रमांमुळे जलसंवर्धनाला मोठी चालना मिळत आहे

PM Modi praises Nashik Catch the Rain
Nashik Politics : ठाकरेंचे 12 नगरसेवक शिदेंच्या गळाला लागलेच होते ; ऐनवेळी भाजपनेच फिरवला खेळ? नाशिकच्या राजकारणात इनसाइड गेम !

कॅच द रेन (Catch the Rain) अभियानाचा मुख्य उद्देश पावसाच्या प्रत्येक थेंबाचे स्थानिक पातळीवर संवर्धन करून जलसुरक्षा मजबूत करणे हा असून, त्यासाठी शासन, ग्रामपंचायती, विविध विभाग, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यात आला आहे.

लोकसहभागाच्या बळावर जिल्ह्यात जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त होत आहे. या उपक्रमाची दखल घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या National Water Mission अंतर्गत आयोजित ५५ व्या Water Series Webinar मध्ये वक्ते म्हणून विशेष निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी "Best Practices of Water Management" या विषयावर आयोजित या राष्ट्रीय स्तरावरील वेबिनारमध्ये 'Catch the Rain' अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध जलसंधारण उपक्रमांचे सादरीकरण केले होते.

PM Modi praises Nashik Catch the Rain
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस नवे शिक्षणमंत्री होणार, संजय राऊत यांचा मोठा दावा; त्या मागचं कारणही सांगितलं...

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान मोदी म्हणाले, की ‘मन की बात’मध्ये ‘कॅच द रेन’चा उल्लेख करताना गेल्या भागात मी तुमच्याशी पावसाचे पाणी अडविण्याच्या मोहिमेविषयी चर्चा केली होती. पावसाचा प्रत्येक थेंब साठविण्याच्या या मोहिमेला लोकचळवळ बनवावे, असे आवाहन केले होते. ‘कॅच द रेन’चा संदेश अतिशय सोपा आहे. जिथे पाऊस पडेल, जेव्हा पाऊस पडेल, पाणी तिथेच साठवा.

देशभरात ४ जुलैपासून एक विशेष मोहीम राबवली जात आहे. याद्वारे पावसाच्या पाण्याचे संकलन, भूजल फेरभरण, जुन्या जलस्रोतांचं पुनरुज्जीवन आणि वृक्षारोपणाला नवी गती दिली जात आहे. मला अत्यंत आनंद होत आहे, की या मोहिमेंतर्गत महाराष्ट्रातील नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठविण्याची क्षमता निर्माण करण्यात आली.

मध्य प्रदेशातील सिंधी जिल्ह्यात सुमारे दीड हजार तलाव निर्माण करण्यात आले आहेत. नरसिंगपूरमध्ये 'अमृत सरोवरं' विकसित करण्यात आली आहेत. आंध्र प्रदेशातील नंद्यालमध्ये सर्व ग्रामपंचायती या अभियानात सहभागी झाल्या असून, तेथील जुन्या तलावांचं पुनरुज्जीवन करून त्यांचा पुन्हा उपयोग सुरू करण्यात आला आहे. आपली शहरही मागे नाहीत. छत्तीसगडमधील कोरबा, ओदिशामधील भुवनेश्वर आणि आंध्र प्रदेशातील विजयनगरम इथेही या अभियानाचे उत्साहवर्धक परिणाम दिसून येत आहेत.

आपणही आपल्या परिसरातील एखाद्या तलावाची, विहिरीची किंवा बारवाची जबाबदारी स्वीकारूया आणि पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याचा निश्चय करूया. आज वाचवलेला प्रत्येक थेंब हा येणाऱ्या पिढ्यांच्या सुरक्षित भविष्याची सर्वात मोठी पुंजी ठरेल.

पावसाचे पाणी जतन करण्यासाठी सुरू असलेल्या Catch the Rain अभियानात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले. गाव, शहर, पंचायत आणि स्वयंसेवी संस्था जलसंधारण, भूजल पुनर्भरण, तलाव पुनरुज्जीवन आणि वृक्षलागवडीत सहभागी होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

दरम्यान, पीएम मोदींनी या उपक्रमाचे कौतुक केल्यानंतर यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी 'मन की बात' कार्यक्रमातून 'कॅच द रेन' अभियानाच्या माध्यमातून पावसाचा प्रत्येक थेंब जतन करण्याचे केलेले आवाहन देशभरातील जनतेने उत्स्फूर्तपणे स्वीकारले.

या लोकसहभागाचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उभारण्यात आलेली जलसंचयन क्षमता. चला, आपण सर्वजण या लोकचळवळीचा सक्रिय भाग बनूया आणि हा उपक्रम राज्यातील प्रत्येक गाव, शहर आणि परिसरापर्यंत पोहोचवून जलसंवर्धनाला प्रोत्साहन देऊया.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com