Rupali Chakankar Controversy: संभाजीराजे संतापले, थेट मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी, राजीनामा देत नसतील तर चाकणकरांची हकालपट्टी करा!

Nashik Chhatrapati Sambhaji Raje angry, demands Chief Minister to expel Rupali Chakankar- छत्रपती संभाजीराजेंचा प्रश्न, ती कृत्ये ऐकून या बाई कोणत्या काळात आणि महाराष्ट्रात जगतात
Chhatrapati Sambhajiraje
Chhatrapati SambhajirajeSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajiraje Politics: महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या विषयीचा वाद थांबण्याची चिन्हे नाहीत. त्यांच्या राजीनाम्यासाठी सतत विविध नेत्यांक़डून नवा राजकीय दबाव निर्माण होत आहे. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापले आहे. 

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी भोंदू बाबा कॅप्टन खरात याचे पाद्यपूजन केले. त्याच्या मंदिराच्या त्या विश्वस्त आहेत. बाबाच्या डोक्यावर छत्री धरली, यांपासून तर अनेक वाद पुढे आले. 

या प्रकरणामुळे श्रीमती चाकणकर यांच्या विषयी राजकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रतिकूल स्थिती निर्माण झाली आहे. विविध नेत्यांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यामध्ये छत्रपती संभाजीराजे यांनीही आपला संताप व्यक्त केला.

Chhatrapati Sambhajiraje
Captain Ashok kharat: रूपाली चाकणकरांना पुन्हा दणका, माजी सहकारी म्हणाली, वाट कसली बघता, नैतिकता असेल तर लगेच राजीनामा द्या!

महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या बैठकीसाठी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे नाशिकला आले होते. यावेळी त्यांनी वादग्रस्त आणि भोंदू बाबा कॅप्टन खरात या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. असे प्रकार घडतात हे ऐकून धक्का बसल्याचे, ते म्हणाले. 

Chhatrapati Sambhajiraje
Ashok Kharat Controversy : मोठी बातमी! रुपाली चाकणकरांवर कारवाई होणार, प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितले, 'एक दोन दिवसांत...'

महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी या भोंदू बाबाचे पाय धुतले. त्या त्याच्या मंदिराच्या विश्वस्त आहेत. हे ऐकून अक्षरशः शिसारी आली. कान बंद करावेसे वाटले. या बाई कोणत्या काळात वावरत आहेत. कोणत्या महाराष्ट्रात राहत आहेत? असा प्रश्न त्यांनी केला.  

श्रीमती चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. आणि भोंदू बाबा महिलांवर अत्याचार करतो. हे ऐकून देखील किळसवाणे वाटले. ऐकताना कान बंद करावेसे वाटले. आपल्या महाराष्ट्रात हे घडते आहे याचे वाईट वाटते. 

या बाई अद्याप आपल्या पदावर कशा काय राहिल्या?. त्यांनी नैतिकदृष्ट्या केव्हाच राजीनामा द्यायला हवा होता. त्यांनी दिला नाही तर माझे मुख्यमंत्र्यांना सांगणे आहे, त्यांनी तात्काळ त्यांना बडतर्फ करावे. त्यांचा राजीनामा घ्यावा. त्याला अन्य कोणताही पर्याय नाही, असे माजी खासदार संभाजीराजे म्हणाले.

महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यासाठी सातत्याने दबाव वाढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटले आहेत. भाजपनेही आक्रमक स्वरूप धारण केले आहे. यातून राजकीय संकेत स्पष्ट आहेत. त्यामुळे चाकणकर यांची राजकीय कारकीर्द काय वळण घेते? यावर आता चर्चा सुरू आहे. 

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com