Nashik constituency 2024 : शिंदे गटाच्या रॅलीत ठाकरे गटाने पेटविल्या मशाली, रंगले घोषणा युद्ध !

Shivsena Thakre group shouts slogan against Shinde Group in rally : शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यालयासमोर 'हम सब खुद्दार बाकी सब गद्दार'घोषणांनी शिंदे गटाच्या उमेदवाराला हिणवले..
Nashik Shivsena Thakre group
Nashik Shivsena Thakre groupSarkarnama

Shivsena UBT News : नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवारांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. मिरवणुकीने अर्ज भरणाऱ्या या उमेदवारांना शिवसेनेच्या ठाकरे गटांनी प्रचंड घोषणा देत आव्हान दिले. त्यामुळे महायुतीची उमेदवारांची रॅली चांगली चर्चेत आली.

नाशिक मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे आणि दिंडोरीतील भारतीय जनता पक्षाचे (BJP) उमेदवार डॉ. भारती पवार यांनी गुरूवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी शहरातील भालेकर शाळेपासून कार्यकर्त्यांची रॅली काढली. ही रॅली शालीमार येथील शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यालयाजवळ आली असता दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले. त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला. यावेळी पोलिसांनाही कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी धावपळ करावी लागली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nashik Shivsena Thakre group
Karale Guruji On Narendra Modi : पंतप्रधान मोदींना मंगळसूत्रावरून कराळे गुरूजींचे टोमणे...

शिंदे गटाचे उमेदवार आणि कार्यकर्ते शालिमार येथे आले असता, शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाचे चिन्ह असलेल्या मशाली पेटवून जोरदार घोषणा दिल्या. अचानक झालेल्या या प्रकाराने शिंदे गटातील कार्यकर्त्यांची ही चांगलीच धावपळ उडाली. 'हम सब खुद्दार बाकी सब गद्दार' अशा बोलक्या घोषणा देत शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी उमेदवार गोडसे यांना हिनवण्याचा प्रयत्न केला. दहा ते पंधरा मिनिटे दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी सुरू होती. त्यामुळे ही रॅली ठाकरे गटाच्या कार्यालयापासून पुढे जाईपर्यंत पोलिसांची ही सातत्याने धावपळ सुरू होती. ही छायाचित्र टिपण्यासाठी पत्रकारांची आणि छायाचित्रकारांचीही चांगलीच धावपळ उडाली.

नाशिक (Nashik) मतदारसंघात महाविकास आघाडीने शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. वाजी यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत दोन दिवसांपूर्वी आपल्या अर्ज दाखल केला. या पार्श्वभूमीवर ऐनवेळी उमेदवारी मिळालेली आणि पूर्वाश्रमीचे ठाकरे गटाचे खासदार हेमंत गोडसे गुरूवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जात होते. गोडसे यांनी काढलेली रॅली शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यालयासमोरून जाणार असल्याने हा प्रसंग घडण्याची शक्यता होती.त्यामुळे ह्याची चांगलीच राजकीय चर्चा रंगली होती. परिसरातील नागरिकांतही हा प्रकार चर्चेचा विषय ठरला.

(Edited by : Chaitanya Machale)

Nashik Shivsena Thakre group
Maharashtra Politics : राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांनी आता खरेच 'चव' सोडली...?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com