Nashik Crime : बारचालक महिलेने हिंमत दाखवली, भाजपचे मामा आता पुरते अडकले ; आणखी एक गंभीर गुन्हा दाखल

Nashik crime : बार चालक महिलेने भीतीपोटी आधी तक्रार दिली नव्हती. परंतु सध्या पोलिसांकडून सुरु असलेल्या कारवाया पाहाता बार चालक महिलेने हिंमत करुन पुढे येत तक्रार दिली.
Nashik Police arrest BJP leader Mama Rajwade
Nashik Police arrest BJP leader Mama RajwadeSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : शिवसेना ठाकरे गटातून भाजप मध्ये दाखल झालेले मामा राजवाडे हे विसेमळा गोळीबार प्रकरणात सध्या मध्यवर्ती कारागृहात आहेत. अशात त्यांच्यावर आणखी एक गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या नव्या गुन्ह्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मालेगाव स्टॅण्ड परिसरातील बारचालक महिलेला खंडणीसाठी धमकावत तसेच तिचा विनयभंग करत, बार व्यवस्थापकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या मामा राजवाडे, राहुल बागमारसह १६ जणांविरोधात खंडणी व विनयभंगाचा गुन्हा पंचवटी पोलिसात दाखल करण्यात आला आहे.

मामा राजवाडे यांच्या टोळीतील सदस्य बागमारसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना चांगला पोलिसी खाक्या दाखवला आहे. त्यांच्याही तोंडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हे वाक्य वदवून घेण्यात आलं. त्या सर्वांना न्यायालयाने गुरुवारपर्यंत (ता. २३) पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान त्यांचे आणखी काही साथीदार हे फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे.

Nashik Police arrest BJP leader Mama Rajwade
Suhas Kande : एकनाथ शिंदेंनी सुहास कांदेंचं बळ आणखी वाढवलं, नाशिकमध्ये मोठी जबाबदारी सोपवली, खास नवीन पदाची निर्मिती

फिर्यादी महिला या मालेगाव स्टॅण्ड येथे न्यू पंजाब रेस्टॉरंट अॅण्ड बार चालवतात. मामा राजवाडे, राहुल बागमार याच्यासह त्याच्या साथीदारांनी या महिलेकडे पन्नास हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. खंडणी न दिल्यास बारमध्ये तोडफोड करण्याची धमकी दिली होती. संशयितांनी एकदा बारमध्ये राडा घातला. संशयित प्रकाश गवळी याने पीडित बारचालक महिलेचे हात पकडले व विनयभंग केला. बारचे व्यवस्थापक राहुल नंदन यांनाही त्यांनी गंभीर मारहाण केली.

यांना झाली अटक...

राजवाडे टोळीतील - राहुल मगनलाल जैन- बागमार, प्रवीण सुकलाल कुमावत, बाबासाहेब शिवाजी बढे, प्रकाश पांडुरंग गवळी, योगेश हिम्मतराव पवार यांना पोलिसांनी अटक केली.

Nashik Police arrest BJP leader Mama Rajwade
MLA Kishor Patil : किशोर पाटील थेट वाकड्यात शिरले, भाजप आमदारासाठी 'दरवाजा बंद'

हे आजूनही फरार...

संशयित योगेश पवार, विशाल देशमुख, संदीप पवार, लखन पवार, शरद पवार, धिरज शर्मा, चैतन्य दत्तात्रेय कावरे यांच्यासह चार साथीदार हे फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com