Gopichand Padalkar : अशोक खरात, रवींद्र एरंडे प्रकरणात शांत राहिलेल्या पडळकरांची 'तिसऱ्या' प्रकरणात एन्ट्री, CM' ची घेणार भेट

Nashik IT company sexual harassment case : सदर आयटी कंपनीमधील टीम लीडरसह सहा संशयितांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अत्याचार, विनयभंगासह ९ गुन्हे दाखल झाले आहेत.
Gopichand Padalkar
Gopichand Padalkar On Nashik IT company sexual harassment case Sarkarnama
Published on
Updated on

Nashik Crime : कायद्याचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये महिलांच्या लैगिंक शोषणाची तिसरी धक्कादायक, घृणास्पद आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. भोंदू अशोक खरातपाठोपाठ रवींद्र एरंडेने केलेल्या महिलांच्या लैंगिक शोषणाचे प्रकार राज्यभर चर्चेत असतानाच आता शहरातील नामांकित बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत काम करणाऱ्या विवाहित महिला व मुलींवर अत्याचारासह विनयभंग आणि धार्मिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

दरम्यान, अशोक खरात, रवींद्र एरंडे प्रकरणात शांत राहिलेल्या आमदार गोपीचंद पडळकरांची या 'तिसऱ्या' प्रकरणात मात्र एन्ट्री झाली आहे. पडळकर यांनी पुणे येथे पत्रकारपरिषद घेत नाशिकमधील या प्रकारावर भाष्य केलं. पडळकर यांनी हा कॉर्पोरेट क्षेत्रात शिरकाव झालेला 'लव्ह जिहाद' असल्याचं म्हटलं आहे. अशा प्रवृत्तीविरोधात आरोपींवर 'मकोका' अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

नाशिकमधील एका नामांकित कंपनीत गेल्या काही वर्षांपासून महिलांचे शोषण होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. नऊ पीडित तरुणींनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली आहे. भरती प्रक्रियेत दबाव टाकणे, सुट्ट्यांसाठी अटी घालणे आणि सहलींच्या नावाखाली गैरवर्तन केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. पडळकर म्हणाले, लव्ह जिहाद' सारखाच आता कॉर्पोरेट जिहाद समोर आला आहे. त्यात आयटी कंपन्यात कार्यरत असलेल्या उच्चशिक्षीत मुलींना लक्ष्य करुन त्यांच्यावर नियोजनबद्दपणे लैगिंक अत्याचार होत आहे. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला-मुलींनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचं पडळकर यांनी म्हटलं आहे.

Gopichand Padalkar
Nashik Crime: 'कायद्याचा बालेकिल्ला' म्हणवणाऱ्या नाशिक पोलिसांना चपराक! शहरातील मल्टिनॅशनल कंपनीत कर्मचारी महिलांचं होतंय लैंगिक शोषण

पडळकर म्हणाले, नाशिक हे आयटी हब नसले तरी तिथे काही आयटी कंपन्या आहे. पुणे हे मोठे आयटी हब आहे. आयटी कंपन्यांमध्ये असे गैरप्रकार घडत असल्यास संबधित कंपनी अधिकाऱ्यांनी त्याची पडताळणी करणे आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. नाशिकमधील आयटी कंपनीत काम करणाऱ्या महिलेच्या धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचं पडळकर यांनी सांगितलं.

नाशिक येथील सदर कंपनीत एकुण १३० कर्मचारी काम करतात. मात्र अत्याचार झाल्याने मुलींनी नोकऱ्या सोडल्या. मात्र ९ पीडित मुलींनी धाडस करत तक्रार दिल्याने हा प्रकार समोर आला आहे. मागच्या दोन-तीन वर्षांपासून हा प्रकार सुरु असून हे अत्यंत गंभीर असल्याचं पडळकर यांनी म्हटलं. पुण्यातील आयटी क्षेत्रातही असे रॅकेट सक्रीय असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.

Gopichand Padalkar
Pune Police crime : पुण्यात रक्षकच बनले भक्षक! 55 वर्षीय प्राचार्यांना 'पोक्सो'ची भीती दाखवून पोलिसांनीच उकळली खंडणी!

हिंदू मुलींना जाळ्यात ओढण्याचे टास्क

नाशिकमधील या कंपनीत टीम लीडर्सना टास्क दिला जात असे. ते मुलींची मुलाखत घेऊन नोकरीसाठी शिफारस करत आणि त्यानंतर त्यांच्यावर दबाव टाकत. नोकरी कोणी लावली हे सांगणे, सुट्टी देण्यासाठी दबाव टाकणे, तसेच अधिकृत कामाचे कारण सांगून मुलींना बाहेर रिसॉर्टमध्ये घेऊन जाणे व त्यांच्यावर नियोजनबद्ध लैंगिक अत्याचार केले जात असल्याचं पडळकर यांनी म्हटलं असून या प्रकरणात आरोपींवर मकोका कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.

मुख्यमंत्र्यांना भेटणार

नाशिकधील हा प्रकार केवळ एका कंपनीपुरता मर्यादित नसून, हे एक मोठे षडयंत्र आहे. मी स्वतः यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटून राज्यातील इतर मल्टिनॅशनल कंपन्यांबाबतची माहिती देणार आहे, जेणेकरून आपल्या लेकी-बाळी सुरक्षित राहतील, असे पडळकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com