Nashik Crime : आठवले गटाचा बॉस कारागृहातच! गोळीबार प्रकरणात न्यायालयाने जामीन फेटाळला, साक्षीदारांवर दबावाची शक्यता

Court Rejects Bail Prakash Londhe : गेल्या सुमारे दहा महिन्यांपासून कारागृहात असलेल्या लोंढे पिता-पुत्राचा तुरुंगातील मुक्काम आणखी लांबला आहे. गोळीबार प्रकरणात न्यायालयाने दोन्ही पिता-पुत्राचा जामीन फेटाळला आहे.
Ramdas Athawale
Ramdas AthawaleSarkarnama
Published on
Updated on

Nashik Crime : नाशिक शहरातील सातपूर हद्दीतील ओरा बार गोळीबार प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्या आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे निकटवर्तीय प्रकाश लोंढे उर्फ 'बॉस' आणि त्याचा मुलगा दीपक उर्फ 'नाना' लोंढे यांचा 'मोक्का' अंतर्गत जामीन अर्ज नाशिक सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

'पीएल ग्रुप' अर्थात लोंढे टोळीचा म्होरक्या असलेल्या प्रकाश लोढेंनी टोळीच्या सदस्यांना सोन्याच्या चक्क ३२ अंगठ्या वाटल्या होत्या. त्यावरुन तो टोळी चालवत असल्याचे स्पष्ट होते. तर दीपकने खंडणीचा काळा पैसा 'व्हाइट' करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाले आहे.

दोघाही लोंढे पिता- पुत्राला नाशिक सत्र न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला आहे. दोघांनी दाखल केलेले जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने गेल्या सुमारे १० महिन्यांपासून कारागृहात असलेल्या पिता-पुत्राचा तुरुंगातील मुक्काम आणखी लांबला आहे.

न्यायाधीश आर. एन. पांढरे यांच्या न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी झाली. जामिनासाठी आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद करत आपली बाजू मांडली. मात्र, अंबड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सचिन बारी यांनी जामिनास तीव्र विरोध केला. प्रकाश लोंढे यांचा सातपूर परिसरात प्रभाव असून, त्यांना जामीन मिळाल्यास तक्रारदार व साक्षीदारांवर दबाव आणला जाऊ शकतो, असा युक्तिवाद पोलिसांनी केला.

Ramdas Athawale
Prakash Londhe : नाशिकमध्ये यूपी पॅटर्न, लोंढे टोळीचा कारभार जिथून चालायचा 'त्या' इमारतीवरच चालवला 'बुलडोजर'

तपासादरम्यान प्रकाश लोंढे याने आपल्या टोळीतील सदस्यांना सोन्याच्या ३२ अंगठ्या वाटल्याचे, तर दीपक लोंढे याने खंडणीसह बेकायदेशीर मार्गाने मिळविलेला पैसा वैध भासविण्यासाठी ‘भूषण डेअरी’च्या नावाने बनावट कागदपत्रे तयार केल्याचे निष्पन्न झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. तसेच, प्रत्यक्ष पडताळणीदरम्यान संबंधित ठिकाणी अशी डेअरीच अस्तित्वात नसल्याचे आढळून आले आहे.

या प्रकरणाच्या तपासात पोलिसांच्या हाती अनेक पुरावे लागल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलिसांनी कॉल डिटेल रेकॉर्ड, मोबाईल लोकेशन, सहसंशयितांचे कबुलीजबाब यांसह अन्य पुरावे न्यायालयासमोर सादर केले. गोळीबारानंतर काही सहसंशयित लोंढे यांच्या कार्यालयात लपून बसल्याचे तपासात समोर आले असून, तेथून शस्त्रे जप्त करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी हे कार्यालय जमीनदोस्त केले.

Ramdas Athawale
Nashik Prakash Londhe : लोढेंच्या अडचणीत पक्षही सोबत नाही, मंत्री आठवलेही चार हात लांब ..?

या गुन्ह्यातील काही सहसंशयितांना अटी-शर्तींवर जामीन मिळाला आहे. मात्र, लोंढे पिता-पुत्राविरोधातील आरोपांचे स्वरूप, तपासात समोर आलेली त्यांची कथित भूमिका तसेच साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याची शक्यता विचारात घेऊन न्यायालयाने त्यांना जामीन देण्यास नकार दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com