Dr Amol Kolhe: नाशिक- पुणे रेल्वे मार्ग बदलण्यात कोणाचा राजकीय दबाव, खासदार अमोल कोल्हे यांनी रेल्वेमंत्र्यांची केली पोलखोल!

MP Amol Kolhe raises questions on rail route change: नाशिक पुणे रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणावर खासदार कोल्हे म्हणाले, तो प्रश्न तर तंत्रज्ञांनी सोडवला असता.
Amol Kolhe questions Nashik Pune railway route change
Amol Kolhe questions Nashik Pune railway route changeSarkarnama
Published on
Updated on

Nashik Pune Railway News: नाशिक पुणे रेल्वे प्रश्न राजकीय वादाने चिघळण्याची चिन्हे आहेत. या मार्गात सत्ताधारी भाजपच्या काही नेत्यांचे राजकारण सुरू असल्याचा गंभीर आरोप होत आहे. या मार्गात बदल केल्याने नागरिकांमध्ये मोठा संताप आहे.

नाशिक पुणे रेल्वे मार्गाच्या आखणीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी मोठे विधान केले. रेल्वे मंत्र्यांनी केलेला दावा त्यांनी खोडून काढला आहे. रेल्वेमंत्र्यांनी "जीएमआरटी" संस्थेने आक्षेप घेतल्याने नाशिक पुणे रेल्वे मार्ग बदलण्याचा दावा केला होता.

खासदार डॉ कोल्हे म्हणाले, जीएमआरटी संस्थेत २९ देशांच्या शास्त्रज्ञांचा समावेश आहे. मार्गाच्या अलाइनमेंट बाबत काही प्रश्न असता तर या शास्त्रज्ञांनी त्यातून नक्कीच मार्ग काढला असता. मात्र या संस्थेने अशी कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे रेल्वे मंत्र्यांनी केलेल्या दाव्यातील हवाच निघून गेली आहे.

Amol Kolhe questions Nashik Pune railway route change
Satyajit Tambe : नाशिककरांनो जागे व्हा, हीच वेळ आहे संघर्ष करण्याची... आमदार सत्यजित तांबे झाले सक्रिय !

नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा सरळ संगमनेर, नारायणगाव, चाकण, पुणे असाच झाला पाहिजे. या भागातील औद्योगिक आणि कृषी व्यवस्थेच्या दृष्टीने तेच योग्य आहे. मात्र कोणाच्या तरी राजकीय सोयीसाठी त्यात बदल केला जात आहे काय? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.

Amol Kolhe questions Nashik Pune railway route change
Balasaheb Thorat: रेल्वे मंत्र्यांच्या निर्णयावर संताप...बाळासाहेब थोरात नाशिक- पुणे रेल्वे साठी पुन्हा झाले आक्रमक!

नाशिक पुणे मुंबई या सुवर्ण त्रिकोणाला जोडणारा हा रेल्वे मार्ग आहे. पायाभूत सुविधांच्या दृष्टीने तो अत्यंत आवश्यक आहे. शिरूर मतदार संघात त्याचे ५० टक्के भूसंपादन झाले आहे. कोणत्याही शेतकऱ्याचा विरोध नाही.

त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इन्फ्रा मॅन म्हणून परिचित आहेत. त्यामुळे त्यांनी यामध्ये हस्तक्षेप करून हा प्रश्न आणि त्यातील अडचणी सोडवाव्यात, असे खासदार डॉ कोल्हे म्हणाले.

खासदार राजाभाऊ वाजे आणि डॉ अमोल कोल्हे यांनी पक्षांतर केल्यास हा रेल्वे मार्ग होईल, अशी चर्चा आहे. यासंदर्भात खासदार कोल्हे यांनी मोठे विधान केले. ते म्हणाले, सध्या तरी अशी कोणतीही ऑफर माझ्यापर्यंत आलेली नाही. अशी ऑफर आल्यास विचार करू. याचा अर्थ पक्षांतर करू असा कोणीही काढू नये, असेही डॉ कोल्हे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com