Nashik Exam Cheating : नाशिकचा ‘मुन्नाभाई’! बुटात मोबाइल लपवून परीक्षा केंद्रात एन्ट्री; पुढे काय घडलं?

Mumbai High Court Exam Cheating Nashik Center : मुंबई उच्च न्यायालयाच्या शिपाई पदाच्या भरती परीक्षेदरम्यान नाशिक केंद्रावर धक्कादायक प्रकार घडला. परीक्षार्थीने चक्क बुटात मोबाइल फोन लपवून आणला होता.
High Court exam cheating
High Court exam cheatingAI Image
Published on
Updated on

Nashik exam cheating : मुंबई उच्च न्यायालयाच्या शिपाई पदाच्या भरती परीक्षेदरम्यान धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या कॉलेज रोडवरील SMRK महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर एका परीक्षार्थीने चक्क बुटात मोबाइल फोन लपवून परीक्षा केंद्रात प्रवेश केल्याचा आरोप आहे.

प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर मोबाइलच्या माध्यमातून गुगलवर प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न त्याने केला. पर्यवेक्षकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी 30 वर्षीय मनोज निवृत्ती वाघ याच्याविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी (ता. २६) दुपारी साडेचार ते सायंकाळी सहा या वेळेत एसएमआरके महाविद्यालय रोडवरील हॉल क्रमांक ११ मध्ये शिपाई पदाची परीक्षा झाली. परीक्षेसाठी नाशिक रोड येथील कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचे सहायक अधीक्षक तुषार वडघुले आणि प्राध्यापक सौरभ देशपांडे यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती झाली होती.

High Court exam cheating
Students Protest : हायकोर्ट लिपिक पदाच्या परीक्षेत गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, थेट अभिजीत दिपकेंचा व्हिडिओ काॅल

परीक्षेदरम्यान बैठक क्रमांक पी-१५१६२१ वर बसलेला मनोज वाघ विनापरवानगी मोबाईलचा वापर करून प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे सोडवित असल्याचे पर्यवेक्षकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर परीक्षा केंद्रावर संबंधित परीक्षार्थीविरुद्ध कारवाई करण्यात आली. या प्रकरणी तुषार वडघुले यांनी दिलेल्या तक्रारीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात मनोज वाघ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक शरद पाटील पुढील तपास करीत आहेत.

या घटनेमुळे पुन्हा एकदा भरती आणि स्पर्धा परीक्षांच्या पारदर्शकतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यात यापूर्वीही पेपरफुटी, परीक्षांमधील गैरप्रकार, बनावट उमेदवार आणि कॉपीसारख्या घटनांमुळे परीक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता तर नीट, टीईटी नंतर MPSC चा देखील पेपर फुटल्याचं समोर आल्यानं वातावरण तापलेलं असून विद्यार्थ्यांमध्ये व्यवस्थेविरोधात प्रचंड रोष आहे.

लाखो विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत करून परीक्षा देत असताना काही जण शॉर्टकटचा मार्ग अवलंबत असतील, तर त्याचा थेट परिणाम प्रामाणिकपणे तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या संधींवर होतो.

High Court exam cheating
Eknath Khadse : खडसेंनी मैत्रीचा हात पुढे केला, भाजप नेत्यांनी तो झटकला ; न फडणवीस आले, न महाजन !

नाशिकमधील या प्रकरणात प्रश्नपत्रिका केंद्राबाहेर फुटल्याचा प्रकार नसला, तरी परीक्षा केंद्रातच मोबाइल लपवून नेण्याचा प्रयत्न ही सुरक्षाव्यवस्थेसाठी गंभीर बाब आहे. त्यामुळे केवळ गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांवर कारवाई करण्याबरोबरच परीक्षा केंद्रांवरील तपासणी, इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर नियंत्रण आणि संपूर्ण भरती प्रक्रियेतील सुरक्षा अधिक कडक करण्याची गरज अधोरेखित होते. परीक्षा कोणतीही असो, तिच्यावर विद्यार्थ्यांचा विश्वास टिकवणे ही संबंधित यंत्रणेची तितकीच महत्त्वाची जबाबदारी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com