Nashik News : चिकननंतर दही खाल्लं, आधी पत्नीचा त्यानंतर आता पतीचाही मृत्यू ; मृत्यूचे नेमके कारण शोधणे वैद्यकीय प्रशासनापुढे आव्हान

Nashik Food Poisoning Case : एका शेतकरी दाम्पत्याने रात्री जेवणात चिकन खाल्ल आणि त्यानंतर दही खाल्ल्यानंतर दोघांची प्रकृती अचानक खालावली. आता त्या दोन्ही पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Nashik Food Poisoning Case
Nashik Food Poisoning CaseSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : सध्या खाण्या-पिण्याच्या गोष्टींमधील भेसळ हा राज्यभरात चर्चाचा मुद्दा बनलेला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यापासून त्यांनी भेसळखोरांवर कारवाईचा धडाका लावला आहे.

मध्यंतरी मुंबईतील पायधुनी प्रकरणात कलिंगड खाल्याने विषबाधा झाल्याची घटना समोर आली होती. एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता. आताही अशीच एक अन्नातून विष बाधेची घटना नाशिक जिल्ह्यातून समोर आली आहे.

नाशिक जिल्ह्याच्या बागलाण तालुक्यातील आखतवाडे येथे एका शेतकरी दाम्पत्याने रात्री जेवणात चिकन खाल्ल आणि त्यानंतर दही खाल्ल्यानंतर थोड्यावेळाने दाम्पत्याची अचानक प्रकृती बिघडल्याची घटना घडली. या घटनेत उपचारापूर्वीच पत्नीचा मृत्यू झाला होता, तर पतीवर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आता 10 दिवसानंतर पतीचा देखील मृत्यू झाला आहे.

Nashik Food Poisoning Case
नाशिक कुंभमेळ्यापूर्वी साधू-महंतांचे शस्त्र परवान्यासाठी अर्ज; नेमके काय आहे प्रकरण?

वृद्ध दाम्पत्याची प्रकृती अचानक बिघडली

28 जून रोजी रात्री चिकनचं जेवण आणि त्यानंतर दही खाल्ल्यानंतर या वृद्ध दाम्पत्याची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु दुर्दैवाने उपचारादरम्यान 68 वर्षीय द्वारकाबाई यांचा मृत्यू झाला. तर, त्यांचे पती शांताराम यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, मालेगाव येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) पथक गेल्या आठवड्यात आखतवाडे येथे दाखल झाले होते. पथकाने संबंधित ठिकाणावरील विविध खाद्यपदार्थांचे नमुने संकलित केले होते. सदर नमुने तपासणीसाठी अधिकृत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार होते. मात्र, अद्यापही या विषबाधासंदर्भातील अहवाल समोर आलेला नाही. अहवालातून विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याने हा अहवाल महत्वाचा असणार आहे.

दरम्यान, नेमकी मटणामुळे की दही खाल्ल्याने नक्की विषबाधा कशामुळे झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे, या दाम्पत्याच्या मृत्यूचं कारण शोधून काढणे जिल्हा वैद्यकीय प्रशासनापुढे आव्हान बनलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com