Neelam Gorhe News: 'नीलम गोऱ्हेंनी आमदारकीसाठी पैसे घेतले पण तिकीट नाही दिले...', मोठ्या नेत्याचा खळबळजनक दावा

Allegations Neelam Gorhe demands money for candidature : नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे हे दोन मर्सिडीज घेऊन पद देत असल्याचा आरोप केला होता. मात्र, गोऱ्हे यांनी आमदारकीसाठी तिकीट देण्याचे आश्वासद देऊन पैसे घेतल्याचा आरोप नाशिकच्या माजी महापौरांनी केली आहे.
Neelam Gorhe  Uddhav Thackeray
Neelam Gorhe Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Vinayak Pande News: दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील एका चर्चासत्रात नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरे हे पदासाठी दोन मर्सिडीज घेत असल्याचा दावा केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. मात्र, नीलम गोऱ्हे यांनी आमदारकीचे तिकीट मिळवून देण्यासाठी पैसे घेतल्याचा गंभीर आरोप नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी केला आहे.

विनायक पांडे म्हणाले, मी 43 वर्ष शिवसेनेते आहे. पण माझ्याकडून अथवा कोणाकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अथवा उद्धव ठाकरे यांनी कधीही पैसे घेतले नाही . मी 2014 ची विधानसभा लढण्यास इच्छुक होतो. त्यावेळी आत्ता एकनाथ शिंदेंच्या यांच्यासोबत असलेले अजय बोरस्ते हे देखील उमेदवारीसाठी इच्छुक होते.

Neelam Gorhe  Uddhav Thackeray
Supriya Sule: हम करे सो कायदा? सुप्रिया सुळे भडकल्या; शिंदे सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरणार...

त्यामुळे उमेदवारीसाठी मी प्रयत्न करीत होतो. त्यावेळी नीलम गोऱ्हे यांच्याशी संबंधित एक व्यक्ती माझ्याकडे आली होती. त्या व्यक्तीने तुम्हाला उमेदवारी हवी आहे का? उमेदवारी हवी असल्यास पैसे द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानुसार मी त्यांना पैसे दिले मात्र मला उमेदवारी मिळाली नाही, असे पांडे म्हणाले.

उमेदवारी मिळाली नसल्याने मी गोऱ्हे यांच्याकडे पैसे परत मागितले. त्यांनी मला पैसे परत दिले. मात्र मी जेवढे दिले होते त्यापेक्षा कमी पैसे परत दिले.गोऱ्हे यांच्याबाबत मीच नव्हे तर सबंध महाराष्ट्रातील पदाधिकारी आपले अनुभव सांगू शकतील, असे पांडे यांनी सांगितले.

संजय राऊतांची टीका

संजय राऊत यांनी देखील नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका केली आहे. काही लोकांच्या मर्जीमुळे त्या पक्षात आल्या आणि ताटात घाण करून गेल्या. विधान परिषदेत कोणाकोणाच्या नावावर पैसे जमा केले, असा आरोप राऊतांनी केला. तसेच लक्ष्यवेधी लावण्यासाठी किती पैसे घेत होता? असा सवाल देखील राऊत यांनी गोऱ्हेंना विचारला.

Neelam Gorhe  Uddhav Thackeray
Congress News : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये उद्या मोठ्या घडामोडींचे संकेत; मुंबईत पडद्यामागे नेमके काय घडतंय ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com