Godavari Aarti Controversy : गिरीश महाजनांसमोरच खडाजंगी, राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणाऱ्या गोदावरी आरतीवरुन वाद‌

Godavari Aarti Dispute Nashik Kumbh Mela Flag Hoisting : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत गोदावरीची महाआरती होणार आहे. त्यावरुन आता दोन गटांत वाद उफाळूल आला आहे.
Girish Mahajan | Kumbh Mela Fake Work Order Scam
Girish Mahajan | Kumbh Mela Fake Work Order ScamSarkarnama
Published on: 
Updated on: 

Nashik Kumbh Mela : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचवटीतील रामतीर्थ येथे ३१ ऑक्टोबर रोजी सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वजारोहण सोहळा होणार आहे. या सोहळ्यानिमित्ताने सायंकाळी गोदावरी नदीची महाआरती होणार असून राष्ट्रपती त्यात सहभागी होतील.

त्यामुळे यादिवशी दोन स्वतंत्र आरत्यांऐवज एकच आरती करण्याचा प्रस्ताव कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी (दि.१६) बैठकीत मांडला. मात्र, पुरोहित संघाने आरतीची परंपरा खंडित होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका घेतल्याने मतभेद उफाळून आले.

या वादावर तोडगा काढण्यासाठी रामतीर्थ सेवा समिती व पुरोहित संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये दीड तास बंद दाराआड चर्चा झाली. पण, चर्चेत एकमत होऊ न शकल्याने आरतीचा गुंता कायम आहे. मात्र, दुसरीकडे मंत्री गिरीश महाजन यांनी मात्र, गोदाआरतीवर कायस्वरुपी तोडगा काढण्यात आल्याचा दावा केला आहे.

पंचवटीतील रामतीर्थ परिसरात रामतीर्थ सेवा समिती आणि पुरोहित संघाकडून स्वतंत्रपणे आरती केली जाते. या दोन्ही संस्थांमधील मतभेद गेल्या काही दिवसांपासून चव्हाट्यावर आले आहेत. राष्ट्रपती मुर्मू यांच्या उपस्थितीत होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याच्या दिवशी गोदाकिनारी एकच आरती करावी, असा प्रस्ताव मंत्री महाजन यांनी ठेवला.

यानिमित्ताने नाशिकची प्रतिमा देशभरात योग्य पद्धतीने पोहोचण्यास मदत होईल, असा उद्देश महाजन यांनी बैठकीत व्यक्त केला. परंतु, पुरोहित संघाने या प्रस्तावाला विरोध दर्शविला. त्यामुळे पूर्वतयारी बैठकीतच वातावरण तापले.

Girish Mahajan | Kumbh Mela Fake Work Order Scam
Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकभोवती 'आपत्ती सुरक्षाकवच'; राज्यातील 'या' दहा पालिकांमध्ये स्वतंत्र प्राधिकरण

या वादावर तोडगा काढण्यासाठी मंत्री महाजनांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. ध्वजारोहण बैठकीत झालेल्या वादानंतर मंत्री महाजन यांनी पुरोहित संघ व रामतीर्थ सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकाऱ्यांच्या ॲन्टी चेंबरमध्ये बंददाराआड चर्चा केली. महाजनांनी दोन्ही संघटनांमध्ये समेट घडविण्याचा प्रयत्न केला. परंतु, पुरोहित संघाने आरतीची परंपरा आपलीच असल्याचे सांगत या प्रथेत खंड पडू देणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली.

त्यामुळे दालनात मंत्री महाजन यांच्या समोरच जोरदार खडाजंगी झाली. सरतेशेवटी एकत्रित आरतीवर कोणताही ठोस निर्णय न होता चर्चा आटोपती घेण्यात आली. त्यामुळे यासंदर्भात पुन्हा एकत्र बसून तोडगा काढण्यावर दोन्ही बाजूंनी एकमत झाले.

Girish Mahajan | Kumbh Mela Fake Work Order Scam
Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळा की प्रशासकीय अनागोंदी, राष्ट्रपतींच्या उपस्थितीचा गाजावाजा, निमंत्रणाचाच विसर?

दरम्यान या वादावर कायस्वरुपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. येत्या ३१ तारखेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत एकच आरती होईल, तसेच कायस्वरुपी हा वाद मिटेल असा विश्‍वास मंत्री महाजन यांनी व्यक्त केला.

मात्र, पुरोहित संघाचे सतीश शुक्ल यांनी पारंपारिक आरतीत कोणतीही खंड पडू देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे दीड तास या विषयावर चर्चा होऊनही ठोस निर्णय झाला नसल्याचे सांगितले जात आहे.

तर एकीकडे, आधी पुरोहित संघाच्या वतीने गणेश पूजन, पारंपारिक आरतीचे एक कडवं होईल मग त्यानंतर रामतीर्थ गोदावरी समीतीच्या आरतीला प्रारंभ होईल असा तोडगा काढण्यात आल्याचा दावा देखील केला जात आहे. पंरतु प्रत्यक्षात आरतीचे नियोजन नेमके कसे राहील याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com