Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळा की प्रशासकीय अनागोंदी, राष्ट्रपतींच्या उपस्थितीचा गाजावाजा, निमंत्रणाचाच विसर?

Kumbh Mela President Droupadi Murmu : सिंहस्थ कुंभमेळा प्रारंभ राष्ट्रपतींच्या उपस्थितीत ध्वजारोहणाने होणार आहे. त्याचा मोठा गाजावाजा सुरू आहे. मात्र या कार्यक्रमातील धक्कादायक उणीवा उघड झाल्या आहेत.
President Droupadi Murmu
President Droupadi MurmuSarkarnama
Published on: 
Updated on: 

Kumbh Mela News : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या 31 ऑक्टोबरला कुंभमेळ्याचे नाशिकमध्ये ध्वजारोहण होईल. त्याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती. मात्र राष्ट्रपतींना अद्याप निमंत्रणच देण्यात आले नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनीच त्याला दुजोरा दिला आहे. राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाच्या सविस्तर माहितीची घोषणा लवकरच करण्यात येईल, असे ते म्हणाले.

कुंभमेळा ध्वजारोहण हा महत्त्वाचा कार्यक्रम असतो. त्यासाठी मुख्यमंत्र्यांसह केंद्रातील विविध मंत्र्यांनाही निमंत्रण करण्यात येणार आहे. त्यात उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रित करावे, असा साधूंचा आग्रह आहे.

मात्र कार्यक्रम करण्यात अनेक अडथळे असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे ते त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त आणि नाशिक शहरातील रामकुंड येथे मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू आहेत. त्यामुळे सध्या ते बंद करण्यात आले आहे. अशा स्थितीत तेथे कार्यक्रम कसा करावा ही समस्या आहे.

President Droupadi Murmu
Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकभोवती 'आपत्ती सुरक्षाकवच'; राज्यातील 'या' दहा पालिकांमध्ये स्वतंत्र प्राधिकरण

'त्या' ठिकाणी पडदा लावणार

सुरू असलेली कामे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या अव्यवस्थेला झाकण्यासाठी पडदा लावण्यात येणार आहे. त्यासाठी हिरव्या रंगाचा पडदा लावण्याचा विचार आहे. दुरुस्तीची कामे सुरू असल्याने हा परिसर सध्या विद्रूप झाला आहे. त्यामुळे राष्ट्रपतींच्या नजरेस तो पडू नये याची प्रशासनाला चिंता आहे.

या सर्व गोंधळात प्रमुख पाहुण्या असलेल्या राष्ट्रपतींना निमंत्रणच देण्यात आलेले नाही. त्यासाठी वरिष्ठ स्तरावर संपर्क करण्यात येत आहे. त्यामुळे नमनालाच घडाभर तेल अशी या कार्यक्रमाची स्थिती होते की काय? अशी चिंता सगळ्यांना लागली आहे.

President Droupadi Murmu
Nashik Kumbh Mela : सिंहस्थ बंदोबस्तासाठी नाशिकमध्ये 40 हजार पोलिसांची फौज ; निवासासाठी मंगल कार्यालये, लॉन्स, लॉजेस 60 दिवस ताब्यात घेणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com