Nashik IT Company Case : धर्मांतरामागे महिला 'मास्टरमाईंड', पोलिसांच्या हाती लागेना ; मोबाईल बंद, इन्स्टाग्राम अकाउंट डिलिट

Nashik IT Conversion Case : धर्मांतरामागे एक महिला 'मास्टरमाईंड असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुन्हे दाखल झाल्यापासून ती फरार असून अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही.
Nashik IT Company Case
female mastermind Nida Khan absconding after FIRSarkarnama
Published on
Updated on

Nashik Crime News : नाशिकमधील बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील हिंदू महिला कर्मचाऱ्यांच्या लैगिंक शोषण आणि जबरधस्तीने धर्मांतर प्रकरणात एक महिला 'मास्टरमाइंड' असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कंपनी अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल होताच सावध झाल्याने ती फरार झाली असून, तिचा मोबाईल बंद असल्याने पोलिसांना तपासात अडचण येत आहे.

निदा खान असे संशयित फरार महिलेचे नाव आहे. तीच या अत्याचार व धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयितांपैकी एक असून तीच खरी मास्टरमाईंड असल्याचे सांगितले जात आहे. सध्या संशयित महिला राज्यातील एका दाट लोकवस्तीच्या भागात लपल्याचा एसआयटीला संशय असून, पोलिसांची पथके तिच्या मागावर आहेत.

याप्रकरणात पीडित आठ महिला व एक पुरुष यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार एकुण ९ गुन्हे दाखल आहेत. त्यानुसार संशयित आरोपी दानिश शेख, आसिफ अन्सारी, शफी शेख, रझा मेमन, तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी हे सहाजण नाशिक सेंट्रल जेलमध्ये असून आज त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. सरकारी पक्षाकडून त्यांच्या पोलिस कोठडीची मागणी केली जाणार आहे. तर कंपनीची महिला एचआर हेड अश्विनी चैनानी ही पोलिस कोठडीत आहे. तिला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे, तर संशयित निदा खान पसार आहे.

Nashik IT Company Case
Nashik IT Company Case : त्या IT कंपनीच्या महिला HR हेड'ला थेट पोलिस कोठडी, अत्याचार व धर्मांतर प्रकरणाला धक्कादायक वळण

संशयित निदा खान हिनेच कंपनीतील हिंदू तरुणींसोबत ओळख करुन त्यांचे ब्रेनवॉश केल्याचा पोलिसांना संशय आहे. तिच्या मदतीनेच संशयितांनी कंपनीत काम करणाऱ्या हिंदू युवतींना टार्गेट केलं. निदा खान ही आपल्या धर्मातील चालीरीतींची माहिती हिंदू तरुणींना देत होती.

Nashik IT Company Case
Nashik Crime : कर्मचारी महिलांवर अत्याचार, धर्मांतर ; नाशिकमधील त्या मल्टिनॅशनल IT कंपनीला लागणार कायमचं टाळं...

मूळ नाशिकची असलेली निदा खान हिने काही महिन्यांपूर्वी मुंबईत बदली करून घेतली होती. संशयितांचा वाढता अतिरेक पाहाता तीने सावध भूमिका घेऊन नाशिकमधून काढता पाय घेतल्याचे समजते. गुन्हे दाखल झाल्यापासून नाशिकसह बदलीच्या ठिकाणाहून निदा पसार असून, पोलिस तिचा शोध घेत आहेत. तीचा मोबाईल बंदू असून तीने आपले इन्स्टाग्राम अकाउंट देखील डिलेट केले आहे. तीला अटक केल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती अधिक स्पष्ट होऊ शकेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com