Girish Mahajan : नाशिकचा पालकमंत्री ठरला? सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेवर गिरीश महाजनांच्या नावापुढे ‘पालकमंत्री’ असा उल्लेख...

Nashik Guardian Minister : नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीतील तिढा कायम आहे. अधिकृत पालकमंत्री पदाची घोषणा झालेली नाही. परंतु सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेवर गिरीश महाजनांच्या नावापुढे ‘पालकमंत्री’ असा उल्लेख असल्याने चर्चा रंगल्या आहेत.
Girish Mahajan Nashik Guardian
Girish Mahajan Nashik GuardianSarkarnama
Published on
Updated on

Nashik Guardian Minister : राज्यातील महायुती सरकारचा दीड वर्षाहुन अधिक काळ पूर्ण झाला आहे. परंतु आजूनही रायगड व नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीतील तिढा कायम आहे. आगामी कुंभमेळा जवळ आला असतानाही आजूनही नाशिक जिल्ह्याला अधिकृत पालकमंत्री मिळालेला नाही. शिवसेना-भाजप मधील वादामुळे गिरीश महाजन यांचे पालकमंत्री म्हणून जाहीर केलेले नाव शासनाने रद्द करावे लागले होते.

असे असताना मात्र, आता ‘सिंहस्थ कुंभपर्व’ पुस्तिकेतील उल्लेखामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. पुस्तिकेवर गिरीश महाजन यांचा ‘पालकमंत्री व कुंभपर्व मंत्री’असा उल्लेख करण्यात आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. साम टीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

नाशिकमध्ये पुढील वर्षी कुंभमेळा असून मंत्री गिरीश महाजन हे कुंभमेळा मंत्री म्हणून सर्व नियोजन करत आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिका प्रकाशित करण्यात आली होती. या पुस्तिकेवर मंत्री गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.

Girish Mahajan Nashik Guardian
Girish Mahajan : रायगडमध्ये तटकरेंकडून कॉम्प्रमाईज, नाशिकमध्ये गिरीश महाजनांचा दबदबा कायम... भुजबळ-भुसेंच्या तलवारी म्यान

सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेच्या मागच्या बाजूला हा उल्लेख करण्यात आला आहे. महाजन यांच्या फोटो खाली मा. पालकमंत्री व कुंभपर्व मंत्री श्री. गिरीश महाजन असा उल्लेख आहे. नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अद्याप कायम असताना पुस्तिकेवर अशा प्रकारे उल्लेख आल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.

नाशिक त्रंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेचे काही दिवसांपूर्वी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. या पुस्तिकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे- सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्री गिरीश महाजन यांचा पुस्तिकेच्या मागच्या बाजूला फोटो पाहायला मिळत आहे.

महाजन यांच्या फोटोच्या खाली 'पालकमंत्री आणि कुंभ पर्व मंत्री गिरीश महाजन' असा पुस्तिकेवर उल्लेख केल्याने पुन्हा नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या चर्चांना उधाण आले आहे. महाजन हे अधिकृत पालकमंत्री नसताना अशाप्रकारे पुस्तिकेवर पालकमंत्री म्हणून त्यांचा उल्लेख याकडे राजकीय संकेतांच्या दृष्टीकोणातून बघितले जात आहे.

Girish Mahajan Nashik Guardian
Nashik Government Offices: नाशिकच्या शासकीय कार्यालयांचा होणार कायापालट : 22 कोटींची तरतूद ; जिल्हाधिकारी आयुष प्रसादांची माहिती

नाशिकमध्ये अधिकृतपणे पालकमंत्रीपदाची घोषणा झालेली नसली तरी, मंत्री गिरीश महाजन हेच अघोषित पालकमंत्री असल्याचे बोलले जाते. स्वातंत्र्य दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहणाचा मानही त्यांनाच देण्यात आला. त्यामुळे नाशिकमध्ये पालकमंत्री पदासाठी इच्छुक असलेल्या मंत्री दादा भुसे व मंत्री छगन भुजबळ यांनी आपली तलवार म्यान असून त्यांना डच्चू दिल्याची चर्चा आहे.

जळगावचे पालकमंत्री म्हणूनही उल्लेख

काही दिवसांपूर्वी जळगावमध्ये वृक्षारोपणाचा एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन दोघे उपस्थितीत होते. मात्र, फलकावर गिरीश महाजन यांच्या नावापुढे पालकमंत्री असा उल्लेख होता. त्यामुळे तेव्हाही जळगावच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. महापालिकेकडून फलकावर लिहिताना चूक झाली असेल जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटीलच आहेत असं महाजनांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं होतं.

मात्र, यामुळे मंत्री महाजन एकाचवेळी नाशिक व जळगाव दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावर पाय ठेऊ पाहत आहेत का काय अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com