

Nashik Guardian Minister : यंदाच्या स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये संबंधित पालकमंत्री व मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक जारी केले आहे.
भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार असून नाशिक व रायगडमध्ये ध्वजारोहणाचा मान कुणाला मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून होते. कारण या दोन जिल्ह्यांमधील पालकमंत्री पदाचा वाद आजून मिटलेला नाही.
सामन्य प्रशासन विभागाने जाहीर केलेल्या यादीनुसार मंत्री गिरीश महाजन हे नाशिकमध्ये तर भरत गोगावले रायगडमध्ये ध्वजारोहण करणार आहेत. तर आदिती तटकरे यांना यंदा कोकण विभागीय कार्यालयात ध्वजारोहण करावे लागणार आहे. आदिती तटकरे यांना यंदा कॉम्प्रमाईज करावं लागल्याचं दिसत आहे.
महायुतीमध्ये रायगड व नाशिकच्या पालकमंत्रिपदावरुन चांगलाच तिढा निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले इच्छुक होते. मात्र, आदिती तटकरे यांच्याकडे पालकमंत्रीपदाची धुरा देण्यात आली होती. त्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादीत संघर्ष निर्माण होऊन पालकमंत्री पद रद्द करावं लागलं होतं. मात्र, १५ ऑगस्टच्या ध्वजारोहणाचा मान मात्र, आदिती तटकरे यांनाच मिळत होता.
परंतु, विधानपरिषद निवडणुकांच्यावेळी, आदिती तटकरे यांचे बंधू अनिकेत तटकरेंना शिवसेना पक्षाकडून करण्यात आलेल्या मदतीच्या पार्श्वभूमीवर आता रायगडचा पालकमंत्रीपदाचा तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, रायगडच्या ध्वजारोहणाचा मान यंदा प्रथमच भरत गोगावले यांना देण्यात आला आहे. त्यामुळे, जवळपास गोगावले यांच्याकडेच पालकमंत्रिपदाची धुरा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, त्यावर अधिकृत निर्णय न झाल्याने रायगडच्या पालकमंत्री पदाचा सस्पेन्स अद्यापही कायम असल्याचे दिसत आहे.
दुसरीकडे नाशिकमध्ये मात्र, तेच चित्र कायम आहे. नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्याच हस्ते शासकीय ध्वजारोहण होणार आहे. मागच्यावेळी देखील मंत्री महाजन यांनाच ध्वजारोहणाचा मान मिळाला होता. त्यामुळे नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांचा दबदबा कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. तेच अघोषित पालकमंत्री असल्याचं यातून स्पष्ट होत आहे.
नाशिकमध्ये शिवसेनेचे नेते व मंत्री दादा भुसे व राष्ट्रवादीचे नेते व मंत्री छगन भुजबळ दोघांनी आपल्या तलवारी म्यान केल्याचं दिसत आहे. नाशिकमध्ये ध्वजारोहणाचा मान मिळावा किंवा पालकमंत्रीपद मिळावं अशी शिवसेना व राष्ट्रवादीकडून होणारी मागणी थंड बसस्त्यात पडली आहे. दादा भुसे हे अमरावती येथे ध्वजारोहण करणार असून भुजबळांचे तर नावच यादीत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.