Latest update from Simhastha Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्याची राज्य शासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांवर भर दिला जात आहे. मात्र त्यात आता एका नव्या प्रयोगाचे भर पडणार आहे.
अलाहाबाद येथे होणाऱ्या कुंभमेळायला यंदा मोठी गर्दी झाली होती. मोठ्या गर्दीमुळे अनेक आव्हाने निर्माण होतात. विशेषता सुरक्षेच्या दृष्टीने तो एक गंभीर प्रश्न असतो. या पार्श्वभूमीवर नाशिकला कुंभमेळा होणार आहे.
या संदर्भात सिंहस्थ कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी एक नवा प्रयोग अखला आहे. त्र्यंबकेश्वर येथील आखाड्यांनी त्याला सहकार्य करण्याची तयारी दाखविली आहे. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्यातील सर्वात मोठी परंपरा यंदा बदलणार आहे.
त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळा शाहीस्नान कुशावर्त येथे होते. उशावर्त हे अत्यंत अडचणीच्या ठिकाणी आणि अरुंद वाट असलेल्या ठिकाणी आहे. या छोट्याशा कुशावरतात लाखो भाविकांचे स्नान हे मोठे आव्हान असते.
यासंदर्भात गिरीश महाजन यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात आपले अनुभव सांगितले. गेल्या कुंभमेळ्यात आपण चोविस तास पाण्यात होतो. मी स्वतः गर्दी नियंत्रणासाठी भाविकांना स्नान केल्यावर कुंडातून बाहेर काढत होतो. यंदा त्या दृष्टीने मोठी समस्या आणि आव्हान आहे.
त्यामुळे आखाड्यांचे शाहीस्नान नव्या स्वरूपात करण्याचा प्रयत्न असेल. त्याला आखाड्यांच्या पदाधिकाऱ्यांनी संमती दिल्याचा दावा त्यांनी केला. हा प्रयोग झाल्यास सिंहस्थ कुंभमेळ्याचे शेकडो वर्षांची परंपरा बदलणार आहे.
कुशावर्त अरुंद जागेत असल्याने त्रंबकेश्वर बाहेर नवीन घाट आणि कुंड बांधले जाणार आहे. आखाडे शाहीस्नानाला जाताना प्रतिकात्मक दहा साधूंसह आपले निशान आणि इष्ट देवता घेऊन कुशावरतात स्नान करतील. उर्वरित साधू आपल्या अनुयायांसह त्रंबकेश्वर बाहेरच्या घाटावर आणि कुंडात स्नान करतील.
साधूंच्या आखाड्यांनी या प्रयोगाला मान्यता दिल्याने कुंभमेळ्यातील गर्दी नियंत्रणाला मोठा हातभार लागेल. त्यादृष्टीने प्रशासनाने ही सुटकेचा निष्वास टाकला आहे. यंदाच्या कुंभमेळ्यात गटवर्षीच्या तुलनेत चार ते पाचपट अधिक गर्दी अपेक्षित आहे. त्यादृष्टीने मंत्री गिरीश महाजन यांचा हा प्रयोग एक नवा पायंडा ठरण्याची चिन्हे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.