Nashik Ring Road : कुंभमेळा रिंगरोड भूसंपादनाला वेग, जिल्हाधिकाऱ्यांचा मास्टरप्लॅन ; 25 टक्के अतिरिक्त मोबदला अन् Joint Account'चा पर्याय

Land Acquisition for Nashik Ring Road : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराच्या भोवती परिक्रमा मार्ग (रिंगरोड) प्रस्तावित असून त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरु आहे.
Nashik Ring Road
Nashik Ring Road Sarkarnama
Published on
Updated on

Land Acquisition for Nashik Ring Road Gains Momentum : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित असलेल्या परिक्रमा मार्ग (रिंगरोड) प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया वेगाने राबविली जात आहे. आत्तापर्यंत ५६ हेक्टरहुन अधिक जागेची खरेदी झाली असून भूसंपादनाच्‍या मोबदल्‍यापोटी ३६२ कोटी ३४ लाख २४ हजार ४०५ रुपये वितरित झाले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

रिंगरोड प्रकल्प म्हणजे नाशिक शहराच्या भोवती तयार करण्यात येणारा एक मोठा वर्तुळाकार महामार्ग आहे. त्यासाठी भूसंपादन सुरु असून जिल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्‍या पत्रकार परिषदेप्रसंगी जिल्‍हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या प्रकल्पाच्या भूसंपादनाविषयी माहिती दिली.

वडिलोपार्जित जमिनीत कुटुंबातील सर्व सदस्यांची संमती लागते. तसेच पोटहिस्सा न् पडल्याने सामूहिक गट असलेल्या ठिकाणी भूसंपादनाचे पैसे कोणाच्या खात्यात जमा करायचे, हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. भूसंपादनातील या प्रश्नावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तोडगा काढला असून सामूहिक गट असलेल्यांना संयुक्त बॅंक खाते उघडण्याचे आव्हान त्यांनी केले आहे.

Nashik Ring Road
Nashik Ring Road : नाशिकच्या शेतकऱ्यांना धक्का ; 66 किमी रिंगरोडसाठी भूसंपादन सुरूच राहणार, उच्च न्यायालयाचा निर्णय

सामूहिक गट असलेल्‍या जमीनमालकांनी त्‍यांचे संयुक्‍त बँक खाते उघडून पुढील प्रक्रिया पूर्ण करावी. आतापर्यंत २० गावांसाठी १५३४ कोटींचे अवॉर्ड जाहीर करण्यात आले आहे. २५ टक्‍के अतिरिक्‍त मोबदला दिला जात असून, योजनेचा लाभ घेत जादा मोबदला मिळवून घ्यावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केलं आहे. (Nashik News)

जिल्‍हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, आत्तापर्यंत भूसंपादनाच्‍या मोबदल्‍यापोटी ३६२ कोटी ३४ लाख २४ हजार ४०५ रुपये वितरित झाले आहेत. केवळ जिथे सामूहिक गट आहेत, अशा ठिकाणी भूसंपादनास काही प्रमाणात अडचणी येत आहेत, अशा जमीनधारकांनी संयुक्‍तरित्‍या हाताळता येईल असे त्‍यांचे संयुक्‍त बँक खाते (Joint Account) उघडावे.

सद्यःस्‍थितीत २५ टक्‍के अतिरिक्‍त मोबदला दिला जातो आहे. मुदत संपल्‍यानंतर कायद्यातील कलमाप्रमाणे सक्‍तीचे अधिग्रहण केले जाईल. त्‍यावेळी अतिरिक्‍त मोबदला मिळविण्याची संधी मिळणार नाही. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.

Nashik Ring Road
Nashik Collector : जिना चढताना धाप लागलेल्या वृद्धाची अडचण ओळखली, जिल्हाधिकारी आयुष प्रसादांनी जागेवरच केला न्याय

जाधव कुटुंबाकडून थेट खरेदी

MSIDC च्या माध्यमातून खासगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने केलेल्‍या भूसंपादनात मौजे वरवंडी (ता. दिंडोरी) येथील ०.३० हेक्टर क्षेत्राची खरेदी यशस्वीरित्या पूर्ण झाली. ही वडिलोपार्जित जमीन विक्रीसाठी संपूर्ण कुटुंब एकत्र आले. वरवंडीतील बाळकृष्ण जाधव, चंद्रभान जाधव, कैलास जाधव, तसेच कल्पना बनकर यांच्या एकत्रित कुटुंबाच्या मालकीचे ०.३० हेक्टर क्षेत्राची थेट खरेदी प्रक्रिया पूर्ण केली. खरेदीसाठी बाळकृष्ण जाधव यांच्या पत्नी मीराबाई जाधव, त्यांच्या सहा मुली, एक मुलगा, तसेच चंद्रभान जाधव, कैलास जाधव आणि कल्पना बनकर यांच्या परिवारातील सदस्यांसह एकूण १९ जण उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या सकारात्मक सहभागामुळे प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला गती मिळत हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यास मोठी मदत होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com