Nashik News : भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यावर बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबत पार्टी केल्याचे गंभीर आरोप केले होते. यानंतर राज्यात या आरोपाने खळबळ उडाली. आता सलीम कुत्ता प्रकरणावरुन ठाकरे गट आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. खासदार संजय राऊत यांनी आता सलीम कुत्ता प्रकरणी भाजपवरच गंभीर आरोप करुन खळबळ उडवून दिली आहे. (Latest Marathi News)
सलीम कु्त्ता प्रकरणावर संजय राऊत म्हणाले, "बडगुजर यांचा बॉम्बस्फोटातील आरोपीसोबतचा पार्टी, हा भाजपच्या पदाधिकाऱ्याने आयोजित केला होता. सलीम कुत्ताच्या सोबतची पार्टी भाजप पदाधिकाऱ्याने आयोजित केलं आणि त्यांचं निमंत्रण बडगुजरांना आल्यावर ते पार्टीत गेले." यावेळी राऊत व्यंकटेश मोरे यांचा फडणवीसांसोबतचे फोटो दाखवून हा आरोप केल्याने आता या प्रकरणावरुन राजकारण तापण्याची शक्यता आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राऊत पुढे म्हणाले, "सलीम कुत्ताला 'पॅरोल' कुणी दिला? गृहमंत्री कोण होतं त्याची चौकशी करा. जर तो (सलीम कुत्ता) इतका गंभीर आरोपातला गुन्हेगार होता, तर त्याला कोणत्या गृहमंत्र्यांच्या सहीने बाहेर सोडण्यात आलं? 2016 साली गृहमंत्रालय शिवसेनेकडे नव्हतं, मग तो कुणी दिला? याचा तपास भाजपने करावा? मग त्याने आमच्याकडे बोट दाखवावं."
संजय राऊत म्हणाले, 'मकाऊ येथील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा कसिनोतील व्हिडिओ मला आमचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांनी दिला, म्हणून त्यांच्यावर कारवाई त्यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केला झाली, असं समजंतय. अशा प्रकारे कारवाईचं कारण होऊ शकते का? आपला कायदा अशा पद्धतीने काम करतो? मुळात बावनकुळेंचा तो व्हिडिओ बडगुजर यांच्याकडून आला नाही. त्या व्हिडिओशी बडगुजरांचा काहीही संबंध नाही. भाजपच्या अंतर्गत लोकांकडून आपल्याला तो व्हिडिओ आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.